ताज्या घडामोडी

राजुरीमध्ये ६७६ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी २८९ रुग्णांना मोफत चष्मे वाटप तर १३९ रुग्णांची होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

राजुरी ( प्रतिनिधी)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,समर्थ लॉ कॉलेज,समर्थ इन्स्टिट्यूट फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबीर राजुरी येथे सुरु आहे.
या शिबिरा अंतर्गत समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,बेल्हे यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजित करण्यात आले होते.
या नेत्रतपासणी शिबिराचे उद्घाटन राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेठ शेळके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे,गणेश दूध संस्थेचे चेअरमन सुभाष पाटील औटी,शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम डी घंगाळे,ज्ञानदीप चे चेअरमन गोरक्ष हाडवळे,राजुरी ग्रामपंचायतचे सदस्य रंगनाथ पाटील औटी,सखाराम आप्पा गाडेकर,गणेश दुध संस्थेचे संचालक व पत्रकार गंगाराम औटी,महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष गणेशराव हाडवळे,तसेच कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ.संजय लोंढे,डॉ.रमेश पाडेकर,यशवंत फापाळे,डॉ.राजेंद्र निचित,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.उत्तम शेलार,डॉ.संतोष घुले,डॉ.कुलदीप रामटेके,डॉ.नवनाथ नरवडे,डॉ.शरद पारखे,वल्लभ शेळके सर मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
नेत्रतज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर वल्हवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.ओंकार सहाणे,डॉ.किशोर कवडे,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल च्या परिचारिका आणि सहकारी डॉक्टरांच्या टीमने शिबिरातील सर्व रुग्णांची सखोल नेत्र तपासणी केली.या शिबिरात एकूण ६७६ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २८९ रुग्णांना तपासणीनंतर मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले तर २३७ रुग्णांना डोळ्यांचे आवश्यक औषध (ड्रॉप्स) देण्यात आले. तसेच १३९ रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आल्याने त्यांच्यावर लेसर (फेको) मशीनद्वारे भिंगरोपणासह मोतीबिंदू शस्त्रक्रिया समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,बेल्हे येथे पूर्णतः मोफत करण्यात येणार असल्याचे वल्लभ शेळके यांनी सांगितले.

हे शिबिर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे,प्रा.दिनेश जाधव,प्रा.सचिन भालेकर,प्रा.अश्विनी खटींग,प्रा.अजय भागवत प्रा.कल्याणी शेलार,तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गणेश बोरचटे यांनी केले.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!