हर हर महादेवच्या गजरात पिंपळेश्वर कावड सोहळ्याचे पिंपळवंडी येथून भीमाशंकरकडे प्रस्थान

पिंपळवंडी ( प्रतिनिधी) श्री पिंपळेश्वर सेवा समिती पिंपरी व समस्त ग्रामस्थ पिंपळवंडी व पंचक्रोशी यांच्यावतीने श्री क्षेत्र पिंपळेश्वर मंदिर पिंपळवंडी ते श्री क्षेत्र भीमाशंकर या पायी कावड सोहळ्याचे शनिवारी (दि.10 ) सकाळी भीमाशंकर कडे प्रस्थान झाले
गेल्या अकरा वर्षापासून या गावात सोहळ्याचे आयोजन केले जात असून या कावड सोहळ्याचा यावर्षीचा तपपूर्ती सोहळा साजरा होत आहे या कावड सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे श्री पिंपळेश्वर महादेवास अभिषेक करण्यात आला यावेळी जलपूजन पालखी पूजन करण्यात आले त्यानंतर हर हर महादेवच्या गजरात या कावड सोहळ्याचे भीमाशंकर कडे प्रस्थान झाले
हा कावड सोहळा पिंपळवंडी स्टॅन्ड नारायणगाव वारूळवाडी गुंजाळवाडी रामवाडी गिरवली घोडेगाव राजपूर या मार्गे मंगळवारी दि. (13 ) भीमाशंकर या ठिकाणी पोहोचणार आहे भीमाशंकर या ठिकाणी अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे त्यानंतर बुधवारी ( दि. 14 ) रोजी सायंकाळी पिंपळवंडी या ठिकाणी परतणार आहे त्यानंतर गुरुवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत ह भ प गुलाब महाराज खालकर आर्वी यांचे कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे या कावड सोहळ्याचे आयोजन कावड सोहळ्याचे संस्थापक विकास बाजीराव काकडे श्री पिंपळेश्वर सेवा समितीचे अध्यक्ष वसंत शेठ वाघ उपाध्यक्ष बाबाजी दामू काकडे कार्याध्यक्ष गजानन
मोढवे सचिव राकेश पवार सहसचिव रवींद्र बेल्हेकर खजिनदार अविनाश वाघ सदस्य बाबाजी शांताराम काकडे नारायण काकडे निलेश काकडे व श्रीराम निमसे यांनी केले आहे
या कावड सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश अण्णा काकडे सरपंच मेघताई काकडे संगीताताई वाघ सत्यवान काकडे टी आर वामन यांच्यासाह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते



