कांदळी येथील कालिकामाता पतसंस्थेचा दिपस्तंभ पुरकाराने सन्मान

पिंपळवंडी (प्रतिनिधी) सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल का़ंदळी ( ता जुन्नर)
येथील कालिकामाता ग्रामीण पतसंस्थेचा दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटी येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर व दीपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चा राज्य स्तरीय एक ते दहा कोटी गटातील उत्कृष्ट कामकाजा साठी कांदळी ( ता जुन्नर) येथील कालिकामाता पतसंस्थेस’ दीपस्तंभ पुरस्कार प्रथम पुरस्कार काॅसमाॅस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे तसेच सहकार तज्ञ राजश्रीताई पाटील तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे फेडरेशनचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी कालिकामाता पतसंस्थेचे चेअरमन कृषिभुषण मुरलीधर गुंजाळ सचिव दगडु फुलवडे व्यवस्थापक बबनराव भालेराव यांनी हा पुरस्कार स्विकारला पतसंस्थेस हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पतसंस्थेचे सर्व सभासद ठेवीदार व ग्रामस्थ यांनी संचालक मंडळाचे कौतुक केले आहे
हा पुरस्कार मिळाल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष क्रुषीभूषण मुरलीधर गुंजाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की पतसंस्थेचे सर्व सभासद ठेविदार कर्जदार व ग्रामस्थ यांचे योगदान असल्याचे सांगितले



