समर्थ मधील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये ४३२ प्रकल्प : समर्थ च्या स्वस्तिक पवारने बनवलेल्या घरगुती वेल्डिंग मशीन चा प्रथम क्रमांक

बेल्हे ( प्रतिनिधी) पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळावा व प्रदर्शन २०२५-२६ नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन विज्ञान केंद्र भोपाळ चे निवृत्त संचालक विठ्ठल रायगावकर व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे अध्यक्ष अडव्होकेट अहमद खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शनामध्ये विविध शाळांतून ४३२ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्प स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे:-
*प्राथमिक गट-६ वी ते ८ वी बिगर आदिवासी*
प्रथम क्रमांक-श्रीराम जाधव (चैतन्य विद्यालय,ओतूर)
द्वितीय क्रमांक-प्रणव पाबळे(बेल्हेश्वर विद्यालय,बेल्हे)
तृतीय क्रमांक-आर्यन मालुंजकर (विद्या विकास मंदिर,राजुरी)
*प्राथमिक गट -६ वी ते ८ वी आदिवासी*
प्रथम क्रमांक-रोहन कोकणे (न्यू इंग्लिश स्कूल,करंजाळे)
द्वितीय क्रमांक-यश वाघ (शारदा पवार विद्यालय,आंबेगव्हाण)
*माध्यमिक व उच्च माध्यमिक गट ९ वी ते १२ वी बिगर आदिवासी*
प्रथम क्रमांक-स्वस्तिक पवार (समर्थ ज्युनिअर कॉलेज,बेल्हे)
द्वितीय क्रमांक-कार्तिक डुकरे (महात्मा गांधी हायस्कूल,पारगाव)
तृतीय क्रमांक-समर्थ पादीर (श्री अनंतराव कुलकर्णी विद्यालय,नारायणगाव)
*माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-९ वी ते १२ वी आदिवासी*
प्रथम क्रमांक-शुभम पानसरे (भाऊसाहेब बोरा माळशेज विद्यालय, मढ)
द्वितीय क्रमांक – यश घाडगे (संत गाडगे महाराज विद्यालय, पिंपळगाव जोगा)
*माध्यमिक व उच्च माध्यमिक गट- ९ वी ते १२ वी दिव्यांग*
प्रथम क्रमांक-युवराज बुळे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर)
*शैक्षणिक प्रतिकृती – प्राथमिक शिक्षक गट*
प्रथम क्रमांक- उज्वला लोहकरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिवाडे)
द्वितीय क्रमांक -निलेश ढवळे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धनगरवाडी) *शैक्षणिक प्रतिकृती- उच्च माध्यमिक शिक्षक गट*
प्रथम क्रमांक- शुभांगी औटी(गाडगे महाराज इंग्लिश मेडियम स्कूल,ओतूर)
द्वितीय क्रमांक-तुषार आहेर (सरदार पटेल हायस्कूल, आणे)
*शैक्षणिक प्रतिकृती-प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर गट*
प्रथम क्रमांक- संदीप शिंदे (न्यू इंग्लिश स्कूल,करंजाळे)
द्वितीय क्रमांक – चंद्रकांत घाडगे (न्यू इंग्लिश स्कूल,नगदवाडी)
*प्रोत्साहनपर निम्न प्राथमिक गट-१ ली ते ५ वी*
प्रथम क्रमांक-अद्विका डुंबरे (गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर,नारायणगाव)
द्वितीय क्रमांक-कार्तिकेय गाडेकर (समर्थ गुरुकुल,बेल्हे)
तृतीय क्रमांक-अर्णव जोंधळे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी) चतुर्थी क्रमांक-तेजस्विनी आहेर (समर्थ गुरुकुल,बेल्हे)
पाचवा क्रमांक-स्वानंदी सोनवणे (ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल,आळे)
यावेळी प्रदर्शनामध्ये आयुकामार्फत-अवकाश दर्शन व विज्ञान खेळणी मांडणी,दुर्मिळ शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शन यांच्या आयोजन करण्यात आले होते.
प्रकल्प स्पर्धेबरोबरच संगणकीय सादरीकरण स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,विज्ञान प्रश्नमंजुषा,कौन बनेगा विज्ञानपती,पोस्टर सादरीकरण स्पर्धा,चला प्रयोग करूया,हस्तकलेतील विज्ञान,आयडिया बॉक्स कॉम्पिटिशन या स्पर्धाचे आयोजन केले आहे.
नामवंत शास्त्रज्ञ,संशोधक,वक्ते यांची व्याख्याने,गणिती व विज्ञान खेळण्याचे स्वतंत्र दालन,अंधश्रद्धा निर्मूलनपर जादूचे प्रयोग,एआर व्हीआर मार्फत चंद्रयान व मंगळयान मोहीम दर्शन,विद्यार्थी उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आदी उपक्रमाचा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन वृत्ती जोपासण्यासाठी वेगवेगळ्या विज्ञानपूरक उपक्रमांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आलेला होता.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले.
यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर,गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे,बांगरवाडी गावच्या सरपंच विमलताई बांगर,शिंदेवाडी चे सरपंच लक्ष्मण शिंदे,संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली आहेर,प्रा.संजय कंधारे,डॉ.लक्ष्मण घोलप,मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तबाजी वागदरे,जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक काकडे,विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.प्रवीण ताजने, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे,सचिव प्रकाश जोंधळे,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.अनिल कपिले, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कवडे,गुरुकुलच्या प्राचार्य सतीश कुऱ्हे,नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ऐश्वर्या गटकळ,आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ.रमेश पाडेकर,आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख,विज्ञान व गणित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा व महाविद्यालयातून आलेले विज्ञान,गणित शिक्षक,केंद्रप्रमुख व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी तर आभार क्रीडा संचालक एच.पी.नरसुडे यांनी मानले.



