ताज्या घडामोडी

पिंपळवंडीत ग्रामदैवत मळगंगादेवीच्या नवरात्र महोत्सवास रविवारपासून  प्रारंभ 

पिंपळवंडी -( दि ११) प्रतिनिधी

पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथील ग्रामदैवत मळगंगादेवीच्या नवरात्रात महोत्सवास रविवारी ( दि १५) प्रारंभ होत असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे  वै.ह.भ.प.सावळेरामबाबापिंपळवंडी कर यांचे आशिर्वादाने वै. ह. भ. प. दत्तुबाबा लेंडे यांच्या प्रेरणेने व ह. भ. प.तुळशिराममहाराज सरकटे यांचे मार्गदर्शनाखाली येथील ग्रामदैवत मळगंगादेवी मंदिरात गेल्या सत्तावन्न वर्षांपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दैनिक कार्यक्रमात पहाटे चार ते सहा या वेळेत काकडा भजन सकाळी सात ते साडेसात वाजता  विष्णु सहस्त्रनाम सकाळी दहा ते साडेदहा गाथाभजन सायंकाळी साडेचार ते साडेपाच हरीपाठ सायंकाळी साडेपाच ते साडेसहा देवीची आरती व डाका रात्री सात ते नऊ कीर्तन व त्यानंतर हरीजागर होणार आहे या अखंड हरीनाम सप्ताहाच्या काळात ह. भ. प. भागवत महाराज साळूंके ( आळंदी)  कैलासमहाराज खंडागळे (.आळंदी)  ह. भ. प. रूक्मिणीताई लेंडे (आळंदी)  ह.भ.प.ज्ञानेश्वरमाऊली कु-हाडे ( आळंदी)  ह. भ. प. केशव महाराज हगवणे (.गिरवली) ह. भ. प. सौ. सुरेखाताई शिंदे (.कळंब) ह. भ. प. उल्हासमहाराज सुर्यवंशी ( आळंदी)  ह.भ.प.केशवमहाराज मुळीक ( लासुर्णे)  यांचे कीर्तन होणार असून मंगळवारी ( दि२४).विजयादशमीच्या दिवशी ह. भ.प.तुळशिराममहाराज सरकटे ( ओतूर) यांच्या काल्याच्या किर्तनाने या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी गायन व किर्तनास साथ देणार आहेत तर काकडा भजन व किर्तनास साथ नाथामहाराज भटकळ माऊली महाराज लांडगे नेंद्रेमहाराज चक्रधरमहाराज पाचपुते नवनाथबुआ काचळे दशरथबुआ काळे राजारामबुआ शेटे अनाजी बुआ बढे दिलीपबुआ वामन काशिनाथबुआ चाळक किसनबुआ फुलसुंदर हरकुबुआ कोकाटे कोंडीभाऊबुआ वामन सुरेशबुआ रोकडे भगवानबुआ पवार पोपटबुआ कोकाटे नंदूबुआ काचळे सुनिल पटाडे अशोक चिंचवडे योगेश शिंदे अशोक कालेकर तुकाराम भटकळ संतदास काचळे तुकाराम वाकचौरे ओम भटकळ विशाल काचळे बाळशिराम बढे चंद्रकांत वाघ वामन बाम्हणे आदित्य रासकर नानाभाऊ रासकर शांताराम वाघ ओंकार थोरात शिवाजी कोकाटे बाळू कोकाटे शांताराम सोनवणे अनंथा लेंडे कान्हू लांडगे शिवाजी भोर बाबा कालेकर विठ्ठल भटकळ नामदेव भटकळ शरद ताजवे विणेकरी ह. भ. प.दत्तामहाराज वाघ आणि पंचक्रोशीमधील भजन मंडळे उपस्थित राहणार आहेत

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!