जयहिंद फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा. पल्लवी बढे यांना डॉक्टरेट

नारायणगाव ( वार्ताहर) : जयहिंद कॉम्प्रेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका पल्लवी दादाभाऊ बढे यांना सनराइज विद्यापीठ अलवर राजस्थान या ठिकाणावरून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. पल्लवी यांनी एक्सट्रॅक्शन अँड केमो प्रोफाइलिंग इलोफिया हर्बासिया लिंड ट्यूबर्स फॉर अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. डॉ. पल्लवी यांनी तीन आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपले शोध निबंध सादर केले तसेच दोन आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रकाशित केले अशी माहिती जयहिंद संकुलाचे सीईओ डॉ. डी. एस. गल्हे यांनी दिली.
महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग उच्चशिक्षित आहेत आणि या सकारात्मक गोष्टीचा विद्यार्थ्यांना नेहमीच फायदा होतो. महाविद्यालय शिक्षकांना उच्च शिक्षणासाठी कायम प्रयत्नशील असते कारण शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास अवलंबून असतो असे मत प्राचार्य डॉ. तेजस पाचपुते यांनी व्यक्त केले. डॉक्टर पल्लवी बडे यांना डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल
संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, सीईओ डॉ.डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. तेजस पाचपुते, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.



