ताज्या घडामोडी
पिंपळवंडी परिसरात शेतकऱ्यांनी वसुबारस केली साजरी शेतक-यांनी केले गोधनाचे पूजन

पिंपळवंडी ( दि १) – प्रतिनिधी
आश्विन वद्य द्वादशी ला येणारी वसुबारस म्हणजेच गोधन प्रतिपदा यानिमित्ताने पिंंपळवंडी ( ता .जुन्नर) येथील शेतकऱ्यांनी गाय आणि वासराची पूजा करुन हा सण साजरा केला
दिपावली सण म्हटले की आनंद आणि उत्साह वाढविणारा सण या सणाची सुरवात आश्विन वद्य एकादशीला होत असते त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजेच आश्विन वद्य द्वादशीला वसुबारस हा सण
साजरा केला जातो यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास करतात ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते मागील दोन वर्षांपासून दिपावलीवर कोरोनाचे सावट होते तर यावर्षी दिपावलीच्या सणावर ओल्या दुष्काळाचे सावट असल्याचे दिसून येत आहे




