ताज्या घडामोडी

पिंपळवंडीत शाॅक लागून तरुण वायरमनचा दूर्दैवी म्रुत्यू

पिंपळवंडी -( दि १२) पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथील काकडपट्टा शिवारात रोहित्रावर काम करत असलेल्या वायरमनचा शाॅक लागून  म्रुत्यू झाला असल्याची घटना रविवारी ( दि १२) संध्याकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली संदेश नवले ( वय ३० वर्ष रा.कुरण ता जुन्नर जि पुणे)  असे या तरुण वायरमनचे नाव आहे या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात शोककळा पसरली आहे

याबाबत मिळालेली माहिती अशी की महाविरण कंपणीत नोकरी करत असलेला संदेश नवले हे  तीस वर्षीय तरुण वायरमन रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येथील पिंपरीपेंढार रस्त्यालगत असलेल्या विद्युत रोहित्रावर काम करत होता त्याने या विद्युत रोहित्राच्या लिंक पाडून ठेवल्या होत्या व तो या रोहित्राचे काम करत होता अचानक वीज पुरवठा सुरु झाल्यानंतर त्याला जबरदस्त शाॅक लागला व त्याचा जागीच म्रुत्यू झाला घटना घडली त्यावेळी काम सुरु असलेल्या ठिकाणी तेथील काही ग्रामस्थ उपस्थित होते या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मगावितरण कंपणीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!