ताज्या घडामोडी

पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी ते चाळकवाडी दरम्यान वहातुक कोंडी : वाहनांच्या लांबच लांब रांगा



पिंपळवंडी ( दि १८) पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी ते चाळकवाडी दरम्यान शनिवारी  (दि १८) रोजी दुपारी चार वाजल्यानंतर वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

पिंपळवंडी ते चाळकवाडी या दरम्यान पुणे नाशिक महामार्गाचे  पिंपळवंडी परिसरात पुलाचे रखडलेले अर्धवट काम व तेथून अरुंद रस्त्यामुळे दुपारी चार नंतर वाहतूक कोंडी होण्यास सुरवात झाल्याचे तेथील ग्रामस्थांकडून समजले. दीपवली सुट्टीनंतर आज रविवारी पुणे कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या दुपारनंतर मोठ्या प्रमाणात वाढली. पिंपळवंडी परिसरात चार वाजल्यानंतर ट्रॅफिक जॅम होण्यास सुरवात झाली. व पाहता पाहता या रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अगदी सायंकाळी  सहा वाजेपर्यंत येथे वाहनांच्या पुणे बाजुकडे जाणा-या रस्त्यावर अगदी एक ते दीड किलोमीटर पर्यंत रांगा आल्या होत्या. धिम्यागतीने येथून वाहतूक सुरू होती आळेफाटा पोलिस तेथे दाखल झाले. व तेथील स्थानिक ग्रामस्थ व टोल कर्मचारी यांनी वहातुक कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले

चाळकवाडी या ठिकाणी दुभाजक रिकामा असल्यामुळे काही वाहनचालकांनी बेशिस्तपणा करत विरूद्ध दिशेने वाहने नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे वहातुक कोंडीत भर पडली होती त्यामुळे पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!