चाळकवाडी टोलनाक्याजवळ कार व ट्रकचा अपघात : सुदैवाने दोघेजण बचावले
पिंपळवंडी -( दि ६) प्रतिनिधी) पुणे नाशिक महामार्गावर चाळकवाडी टोलनाक्याजवळ मालवाहतूक करणा-या
ट्रकने कारला धडक देऊन झालेल्या भिषण अपघातात कारमधील दोघेजण सुदैवाने बचावले ही घटना शुक्रवारी ( दि६) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली
याबाबत माहिती अशी की आळे ( ता जुन्नर) येथील राकेश शेळके व महेश शेळके हे दोघेजण. त्यांच्या कार ( क्र एम एच १४ जी वाय ७७९४) मधून आळेफाट्याकडून पुणे बाजूला जात असताना त्यांच्या कारला पाठीमागून येणा-या मालवहातुक करणा-या ट्रकने जोरदार धडक दिली व त्यानंतर कार आडवी होऊन सुमारे सत्तर ते ऐंशी फूट फरफटत नेली व पुढे टोलनाक्यामध्ये मध्ये प्रवेश करण्यापूर्वी बांधण्यात आलेल्या कठड्यांना कार अडकली त्यामुळे मोठा अनर्थ टळला या अपघातात कारमधील दोघांना सुदैवाने काही झाले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत
चौकट – चाळकवाडी गावठाणाजवळ पुणे नाशिक महामार्गावर महामार्गाच्या दोन्हीही बाजूला गतिरधक
टाकण्यात आले आहे मात्र त्यावर सफेद पट्टे व गतिरधक असल्याबाबतचे फलक नसल्यामुळे त्या ठिकाणी कायमच अपघात होत असतात याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण लक्ष कधी देणार असा प्रश्न ग्रामस्थ व वाहनचालक उपस्थित करत आहेत



