कै.लक्ष्मण डेरे यांच्या दशक्रिया विधी निमित्त बोरीबुद्रुकमध्ये व्रुक्षदान

बोरी बुद्रुक -( दि ५) बोरीबुद्रुक (डेरेमळा)येथील स्वर्गीय लक्ष्मण डेरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या भाच्यांनी व सामाजिक संस्थांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवत आपल्या मामांच्या स्मर्णार्थ व्रुक्षदान केले या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
याबाबत माहिती अशी की दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी स्वर्गीय लक्ष्मण रघुपती डेरे दशक्रिया निमित्त वृक्ष दान नियोजन करण्यात आले होते त्यामध्ये भाचे योगेश सोनवणे, पत्रकार शिवाजी आतकरी व आपली दृष्टी सामाजिक संस्था व जय गणेश मित्र मंडळ बोरी डेरेमळा ,संपत कोरडे व अजित डेरे हे विविध सामाजिक उपक्रमात पुणे जिल्ह्यात सक्रिय असतात. सामाजिक उपक्रमांमध्ये व्यसनमुक्ती, नेत्रदान कॅम्प, गड किल्ले स्वच्छता नेत्रदान चळवळ, वृक्ष लागवड आणि प्लास्टिक निर्मूलन , पर्यावरण संवर्धन चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्यपूर्ण चालू आहेत त्यानुसारच आपल्या लक्ष्मण म्हणजेच मोठ्यामामाच्या स्मरणार्थ 300 देशी झाडांचे वाटप आपली सृष्टी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज ते करत आहेत. 15 ऑगस्ट अवचित्य साधून आपली सृष्टी सामाजिक संस्था डेरे मळा यांनी 260 झाड लावण्यात आली व वाटप करण्यात आली

काकस्पर्श अनेक पानवट्यावर होत नाही. याला शास्त्रीय कारण म्हणजे अलीकडे देशी झाडे राहिली नाही. अंधश्रद्धा जोपासण्यापेक्षा झाडे लावून त्यांचे संरक्षण केले तर पक्षी त्या झाडांवर येतील. त्यात कावळेही असतील आणि काकस्पर्श ही होतील. धार्मिक भावना ही जोपासली जाईल. असा हेतू वृक्ष लागवडी मागे आहे. हा एक छोटासा आमच्यातर्फे प्रयत्न आहे त्यांचा हा वसा अतिशय स्तुत्य असून. झाडे लावून जगवण्याचा संदेश लक्ष्मण मामाच्या दशक्रियेच्या निमित्ताने त्यांच्या भाच्यांनी या निमित्ताने दिलेला आहे. त्यांनी वाटप केलेली रोपे आपापल्या घरी नेऊन योग्य ठिकाणी लावून त्याचे संवर्धन करण्याची विनंती त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. व मामा चिरंतकाळ आमच्याबरोबर राहतील ही आशा ही त्यांची श्रद्धांजली आगळीवेगळीच म्हणावी लागेल.




