ताज्या घडामोडी

समर्थ संकुलामध्ये १२ व १३ डिसेंबरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

बेल्हे ( प्रतिनिधी)
पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ जुनिअर कॉलेज बेल्हे आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय विज्ञान मेळावा व प्रदर्शन २०२५-२६ समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे १२ व १३ डिसेंबर २०२५ दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांनी दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.प्रवीण ताजने,सचिव प्रकाश जोंधळे सर,कार्यकारिणी सदस्य,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे,सचिव अशोक काकडे,सर्व विभागाचे केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,विज्ञान व गणित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
उपस्थित मुख्याध्यापक,शिक्षकांना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे म्हणाले की,या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला,अंगभूत कौशल्यांना वाव मिळतो म्हणून यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे सहभागी होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.तसेच वाचन,लेखन,गणिती क्रिया व स्पर्धात्मक परीक्षा यासाठी आजचा विद्यार्थी सक्षम व्हावा हा यामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नवनिर्मितीची संधी याच वयात विद्यार्थ्यांनी आत्मसात करून प्रगती साधावी.या प्रदर्शनाला मेळाव्याचे स्वरूप देऊन प्रगत तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी.छोट्या छोट्या प्रतिकृतीतून आनंद घेऊन एक वातावरण निर्मिती होण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शन महत्वाचे आहे.
विज्ञान प्रदर्शन हे केवळ प्रदर्शन न राहता तो एक विज्ञान मेळावा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत.
प्रदर्शनामध्ये आयुकामार्फत-अवकाश दर्शन व विज्ञान खेळणी मांडणी,दुर्मिळ शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शन तसेच प्रकल्प स्पर्धेबरोबरच
संगणकीय सादरीकरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,विज्ञान प्रश्नमंजुषा, कौन बनेगा विज्ञानपती,पोस्टर सादरीकरण स्पर्धा तसेच चला प्रयोग करूया,हस्तकलेतील विज्ञान,आयडिया बॉक्स कॉम्पिटिशन
आणि यांचबरोबरनामवंत शास्त्रज्ञ,संशोधक,वक्ते यांची व्याख्याने,गणिती व विज्ञान खेळण्याचे स्वतंत्र दालन,अंधश्रद्धा निर्मूलनपर जादूचे प्रयोग,विद्यार्थी उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आदी उपक्रमाचा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन वृत्ती जोपासण्यासाठी वेगवेगळ्या विज्ञानपूरक उपक्रमांचा या प्रदर्शनात समावेश केला जाणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.
या मेळाव्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करणार असून त्याद्वारे मार्गदर्शन देण्यात येईल.व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागाबाबतचे प्रमाणपत्र देणार असल्याचे विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.प्रवीण ताजणे यांनी सांगितले.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!