ताज्या घडामोडी

शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील वटवृक्ष – वल्लभ शेळके सर

वल्लभ शेळके सरांनी रयत शिक्षण संस्थेच्या बेल्हेश्वर विद्यालय बेल्हे येथे सात वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले आहे. विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे , विद्यार्यांना केलेले वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे ते अल्पावधीतच विद्यार्थी प्रिय ठरले.माध्यमिक शिक्षक ते एक यशस्वी संस्थाचालक हा त्यांचा प्रवास सर्वांना थक्क करणारा आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला आहे.माध्यमिक शिक्षक असताना २००८ मध्ये शेळके कुटुंबाने स्थापन केलेल्या संस्थेत आज सुमारे ७००० विद्यार्थी आणि ७००. कर्मचारी आहेत. या संस्थेत एकूण १४ प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. ही भुषणावह बाब होय. यानिमित्ताने आपल्या परिसरातील मुले मुली मोठ्या प्रमाणावर उच्च विद्याविभूषित होत आहेत.सरांच्या पत्नी सौ स्नेहल ताई जिल्हा परिषदेच्या सदस्या असताना या जिल्हा परिषद गटाने सरांची कार्यकुशलता अनुभवली आहे.रस्ते , पाणी, शिक्षण, सामाजिक सभागृह यासंदर्भातील कामे असोत.वैयक्तिक लाभाच्या योजना असो….सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले आहे.प्रचंड वाचन ,चिंतन, निरिक्षण .अभ्यासू वृत्ती , घेतलेले वेगवेगळे अनुभव यामुळे त्यांनी मांडलेले विचार मार्गदर्शक,प्रेरणादायी असतात. दूरदर्शीपणा ठेवून सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.उच्च शिक्षण, साधी राहणी, विनम्रता, निर्व्यसनता, शालिनता , सुसंस्कृत पणा , एक कुशल संघटक…… गोरगरीबांना , गरजूंना मदत करण्याची भूमिका यामुळे त्यांच्या समवेत सतत विविध स्तरांतील लोक असतात., सोने , दागिने याविषयी आकर्षन नसणारे, स्वतः मोटार सायकल, फोर व्हीलर न चालवणारे, खिशात मोजकेच पैसे ठेवणारे , साधी राहणी असणारे , निगर्वी स्वभावाचे सर ! प्रत्येकालाच आपले वाटतात.शैक्षणीक क्षेत्रामुळे , सामाजिक क्षेत्रातील कारणांमुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद निवडणूकी निमित्ताने राजुरी येथे एक महिला मेळावा घेतला गेला, त्यावेळी झालेली उच्चांकी गर्दी त्यांनी ठेवलेल्या जनसंपर्काची खर्या अर्थाने पावती होती. आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने त्यांनी ४००० पेक्षा जास्त वारकर्यांना, अत्यंत सुंदर नियोजन करून पंढरीची वारी घडवून आणली ही बाब देखील कौतुकास्पद आहे.आपल्या संबंधित असणाऱ्या सर्वांच्या सुखदुःखात सहभागी राहण्याचा ते प्रयत्न करतात.फेसबुक, व्हाटसऍप, इंस्टा्ग्राम, इलेक्ट्रॉनिक मिडिया यांचा वापर न करता त्यांना प्रसिध्दी पासून दूर राहायलाच आवडते.कला , क्रीडा, अध्यात्म, शेती , उद्योग ,

राजकारण, साहित्य , तंत्रज्ञान, वैद्यक शास्त्र याबाबतीत असणारे वाचन, जिज्ञासू वृत्ती यामुळे कोणत्याही विषयावर ते अभ्यासपूर्ण बोलू शकतात.भारतीय इतिहासाचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.बोलताना मिमिक्री करणे , विनोदी शैली, आवाजातील आरोह -आवरोह यामुळे त्यांच्या सोबतच्या गप्पा म्हणजे, जणू एक मैफिल असते.स्वामी समर्थ सेवेकरी असल्याने ते शुद्ध शाकाहारी आहेत. पण…… खाण्याच्या बाबतीत मात्र ते खूप चोखंदळ आहेत, मित्रपरिवाराच्या सोबत विविध खाद्यपदार्थावर ताव मारायला त्यांना आवडते. राजुरी गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माऊली शेठ , बंधू विवेकशेठ सर्व कुटुंबीय सरांच्या भक्कमपणे पाठीशी असतात. नव्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत असताना त्यांच्या पत्नी सौ. स्नेहलताई राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार आहेत. सरांच्या जनसंपर्काचा ताईंना नक्कीच फायदा होईल. वाढदिवसा निमित्ताने सर आपल्या मित्रमंडळासह जिल्हा परिषद गटातील ग्रामदैवताच्या दर्शनासाठी येत आहेत..वक्तृत्व ,नेतृत्व, दातृत्वाचा त्रिवेणी संगम असणार्या श्री वल्लभ शेळके सरांना परीवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा**.🌹🌹🌹🌹

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!