जुन्नर ( दि २९) आनंद कांबळे
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झालेली असून शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोठे योगदान दिलेले आहे. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून आज पर्यंत सभासद हिताच्या अनेक योजना संस्थेने राबविलेल्या आहेत. अतिशय कमी व्याजदर व मृत्यू पावलेल्या सभासदाला ३० लक्ष रुपये मदत या योजना महाराष्ट्रातील इतर संस्थांना दिशादर्शक आहेत. शताब्दी पूर्ण करणाऱ्या या संस्थेस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.’ असे गौरवोद्गार राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे राजा शिवछ्त्रपती सभागृह जुन्नर येथे करण्यात आले होते. यावेळी पतसंस्थेची १०० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी पगारदार पतसंस्थेच्या सभासदांची शेअर्स मर्यादा २ लक्षांहून ५ लक्ष करण्याबाबत शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा नियोजन समिती सदस्या आशाताई बुचके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडूरंग पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खंडागळे, गुलाब पारखे, मोहित ढमाले, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती प्रकाश ताजणे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, संचालक संतोष खैरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका पुजा बुट्टे, युवा नेते अमित बेनके, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहकारी अधिकारी संतोष भुजबळ, सेवा निवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदाम ढमाले, उज्वला शेवाळे व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती पतसंस्थेचे सभापती विजय लोखंडे यांनी दिली.
याप्रसंगी शताब्दी महोत्सवानिमित्त स्मरणिका प्रकाशन करण्यात आले. तसेच शताब्दी महोत्सव स्मृती फलकाचे अनावरण, शताब्दी महोत्सव मुदत ठेव योजनेचा शुभारंभ, माजी सभापती, माजी सरचिटणीस, पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा, उच्चशिक्षण घेतलेले शिक्षक, पदोन्नती प्राप्त शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक आणि संस्थेच्या सभासदांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार अतुल बेनके म्हणाले, ‘ संस्था उभारणीमध्ये सर्व सेवा जेष्ठ सभासदांचे फार मोठे योगदान आहे. संस्थेची शताब्दी साजरी करताना अतिशय आनंद होत आहे. जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या विविध योजनांचा पॅटर्न यापुढील काळात महाराष्ट्रभर राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल’
याप्रसंगी गेली १०० वर्ष शिक्षकांचे कल्याण करणाऱ्या या संस्थेचे काम आदर्शवत असल्याचे मनोगत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
माजी आमदार शरद सोनवणे यांनी संस्थेच्या योजनांचे कौतुक करून यापुढील काळात संस्थेस निश्चित मदत केली जाईल असे मनोगत व्यक्त केले.
१०० वर्षाची गौरवशाली परंपरेची गरिमा राखण्याचे काम विद्यमान संचालक मंडळाने केले असून या पतसंस्थेचा येणारा काळ आचंद्रसूर्य असेपर्यंत गगनाला भिडणारा असावा अशा शुभेच्छा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य ज्ञानेश्वर खंडागळे, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केले व संस्थेस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सभापती विजय लोखंडे यांनी प्रास्ताविक केले व संस्थेच्या गौरवशाली कार्याचा आढावा दिला.
पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संचालक मंडळाने मांडलेले अहवाल, वार्षिक ताळेबंद, नफा तोटा पत्रक, शिफारस ठराव, पोटनियम दुरुस्ती ठरावांना चर्चा करून वार्षिक सभेने मान्यता दिली. यावेळी शेअर्स व मासिक बचत ठेव वर्गणी वाढ व कर्ज व्याज दर ८.५० % करण्यास एकमताने मान्यता देण्यात आली. तसेच एन.पी.एस.धारक सभासद शिक्षकांना मृत्यूनिधी योजनेची कमाल मदत रुपये ३२ लक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे सल्लागार संजय डुंबरे, संपर्क प्रमुख मंगेश मेहेर, उपाध्यक्ष विनायक ढोले, प्रतिनिधी साहेबराव मांडवे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सुशिला डुंबरे, अखिल पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुभाष मोहरे, नेते किरण गावडे, राज्य संघटक चंद्रकांत डोके, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, नेते विश्वनाथ नलावडे, कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ, कोषाध्यक्ष अशोक बांगर सरचिटणीस प्रभाकर दिघे, विकास मटाले, उपेंद्र डुंबरे, भरत बोचरे, सुदाम ढमाले, रामदास संभेराव, संतोष पानसरे, रियाज मोमीन, महिला आघाडी तालुका अध्यक्षा शुभदा गाढवे, कार्याध्यक्षा उज्वला लोहकरे, कोषाध्यक्षा मनिषा डोंगरे, सरचिटणीस वैशाली नायकोडी, स्वप्नजा मोरे, एकल मंचचे अध्यक्ष सुरेश देठे, शिक्षक समिती अध्यक्ष राजेश दुरगूडे, अखिल शिक्षक संघटना अध्यक्ष विवेक हांडे, तालुका संघ अध्यक्ष मोहन नाडेकर, शिक्षक भारती संघटक नितीन शिंदे, जुनी हक्क पेन्शन संघटनेचे अध्यक्ष राहुल पडवळ व सर्व कार्यकारणी तसेच तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष ललित गाढवे, सदस्य उत्तम आरोटे, सदस्य तानाजी तळपे हे उपस्थित होते. सर्व माजी सभापती, उपसभापती, सरचिटणीस व तालुक्यातील सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. संस्थेचे उपसभापती दतात्रय घोडे, मानद सचिव ज्ञानदेव गवारी, खजिनदार अंबादास वामन, सरचिटणीस विवेकानंद दिवेकर व सर्व संचालक मंडळाने कार्यक्रमाचे नियोजन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका सुनिता वामन व संचालक संतोष पाडेकर यांनी केले. आभार संचालक सचिन मुळे यांनी मानले.
यावेळी संचालक सविता कुऱ्हाडे, पूनम तांबे, नानाभाऊ कणसे, अनिल कुटे, जितेंद्र मोरे, रविंद्र वाजगे, अविनाश शिंगोटे, दिलीप लोहकरे, विजय कुऱ्हाडे, बाळू लांघी, तज्ञ संचालक सुभाष दाते, सहचिटणीस उमेश शिंदे यांनी कामकाजात सहभाग घेतला.
कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय)
सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल