ताज्या घडामोडी

तेरा महाविद्यालयांच्या सहभागात जागतिक फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा

 

 

आळेफाटा:आळेफाटा (ता.जुन्नर) येथे सोमवारी (दि.२५) इंडिया फार्मास्युटिकल असोसिएशन लोकल ब्रांच, आळेफाटा यांच्या संयुक्त विदयामाने “जागतिक फार्मासिस्ट दिन” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांचचा हा पहिलाच भव्य कार्यक्रम “फार्मासिस्ट डे” चे औचित्य साधुन करण्यात आला. गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करून पथनाटय स्पर्धा व भव्य फार्मासिस्ट रॅली चे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील १३ फार्मसी कॉलेजमधील विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग दर्शविला. त्यामध्ये विशाल जुन्नर इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी आळे. विशाल जुन्नर इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी फॉर उमेन आळे, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी संगमनेर, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी ओतूर, अमृतवाहिनी इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी संगमनेर, शिवनेरी इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी खानापूर, विशाल इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आळे, समर्थ इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी बेल्हे, विदयानिकेतन रिसर्च सेंटर बोटा, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे, मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगाव अकोले, श्री. स्वामी समर्थ इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी माळवाडी, जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहाणी असे एकूण तेरा कॉलेज कार्यक्रमात सहभागी झाले.
२०२३ च्या फार्मासिस्ट डे साठीची संकल्पना “फार्मसीतुन आरोग्यप्रणाली मजबूतीकरण करणे व अवयवदानाविषयी जनजागृती करणे” ही होती. या संकल्पनेस अनुसरून भव्य पथनाटयस्पर्धा आयोजित केली गेली. या स्पर्धेसाठी बी. जे. कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज, आळे येथील प्राध्यापक डॉ.जे.एच.गाडेकर यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक विशाल इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्युिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आळे, द्वितीय क्रमांक समर्थ इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी, बेल्हे व तृतीय क्रमांक शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी, ओतूर यांनी मिळविला. यानंतर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.ही रॅली अथर्व मंगल कार्यालय, आळे येथुन सुरु झाली.या रॅलीमध्ये ८४२ विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रॅली आळेफाटा येथे पोहचल्यानंतर विजयी संघाचे पथनाटय आळेफाटा बस स्थानकात सादर करण्यात आले. त्यासाठी आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे आणि वाहतूक नियंत्रक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. फार्मसी महाविदयालय, आळे येथे भव्य रॅलीचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आळेफाटा येथील उद्योजक राजेंद्रशेठ भळगट, संजीवन फार्मा आळेफाटा चे संकेत नवले, मोरया मेडिकल आळेफाटा चे ऋषीकेश शेळके, यांनी चहा-नाश्त्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमास इसी मेंबर सी. ए. पी. डी. पुणे चे संदीप कोरडे ,एस. पी. जी.एस.चे संचालक संजूशेठ गांधी, ग्रामोन्नती मंडळ आळे चे संचालक बाबुशेठ कुऱ्हाडे , जुन्नर तालुका झोनल चे अध्यक्ष जालिंदर पटाडे ,इंडियन फार्मासिटिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दुष्यंत गायकवाड, जॉईंट सेक्रेटरी डॉ. रूपाली हांडे ,कौन्सिल मेंबर प्राचार्य डॉ.सुरेश जाधव ,प्राचार्या डॉ. लीना पाठक, डॉ.जयंत बिडकर ,डॉ. बिपिन गांधी उपस्थित होते. संदीप कोरडे यांनी सर्व उपस्थित फार्मासिस्टला जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुराधा जाधव यांनी केले.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!