ताज्या घडामोडी

पोलिस अंलदार अशोक फलके यांच्या सेवानिव्रुत्ती समारंभ संपन्न : मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

 

आळेफाटा:( दि ३) प्रतिनिधी
पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अशोक फलके यांचा यानिमित्त ग्रामस्थ व पोलीस दलाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अशोक फलके यांनी पोलीस दलात मुंबई, मंचर, नारायणगाव व आळेफाटा पोलीस ठाण्यांमध्ये गेली तीस वर्ष सेवा केली. ते सेवानिवृत्त झाले यानिमित्त आळेफाटा येथील सौभद्र हाॅल मंगल कार्यालयात त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर पोलिस उपनिरीक्षक अनिल
पवार, रागिनी कराळे भाजपा नेत्या आशाताई बुचके सरपंच प्रितम काळे संतवाडी सरपंच नवनाथ निमसे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, किरण ढवळपुरीकर माजी सभापती रघुनाथ लेंडे पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे डाॅ पंजाब कथे, मंगेश काकडे, क्रीडा शिक्षक एच पी नरसोडे, कैलास वाळूंज व परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी पोलिस पाटील व ग्रामस्थ यांचे वतीने भव्य सत्कार करण्यात आला .

यानिमित्त पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. यानंतर आयोजित कार्यक्रमात अशोक फलके यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस दलात त्यांनी केलेल्या प्रामाणिकपणे सेवेचे यावेळेस सर्वांनी कौतुक करत पुढेही समाजसेवेत कार्यरत राहावे असे आवाहनही केले. तर पोलीस दलात प्रामाणिकपणे काम करत असताना समाजिक उपक्रम राबवल्यामुळे आज ग्रामस्थांनी माझा सत्कार केल्याने मी भारावून गेल्याचे यावेळेस अशोक फलके यांनी बोलताना सांगितले.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!