समर्थ मध्ये अविष्कार २०२६ स्पर्धा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा महत्त्वाची – स्नेहलताई शेळके

बेल्हे ( प्रतिनिधी ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणेरे व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे मुंबई विभागीय आविष्कार स्पर्धेचे आयोजन नुकतेच शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी फार्मसी आणि इंजीनियरिंग शाखेचे १३५ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ,लोणेरे चे डीन चे डॉ.विशाल पांडे,विद्यापीठ आविष्कार समन्वयक डॉ.संजय खोब्रागडे उपस्थित होते. तसेच आविष्कार 2026 च्या कार्यक्रमासाठी विशेषतः नारायणगाव, मंचर, बोटा, कर्जुले हर्या, संगमनेर, इंदापूर आणि पुण्यातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके म्हणाल्या की विद्यार्थी हा स्पर्धेतूनच घडत असतो.स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची असून जास्तीत जास्त स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.
विषयानुसार विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
१) मानव्यशास्त्र, भाषा आणि ललित कला:
पदवीधर: पूजा सपाळे – मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,धानोरे,
सानिया पळसकर – लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सायन्स,पुणे,
पदव्युत्तर: संध्या पाटील – कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, रोहन सावंत – सिद्धी कॉलेज ऑफ फार्मसी.
२) वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा:
पदवीधर: पूर्वेशा दळवी – केजेईआय ट्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे, श्रुती दराडे – समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे.
३) शुद्ध विज्ञान-
पदवीधर: सानिका साळुंके – समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे, साक्षी बिरादार – नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे.
पदव्युत्तर: वैभव जाधव – नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे, प्रीती लंबकाणे – कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च.
४) कृषी आणि पशुसंवर्धन:
पदव्युत्तर: वंशिका शेंडे – कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च.
सीमा घोडे – समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे
पदव्युत्तर: अपूर्वा सराफ – अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी. दर्शना शेजवळ – कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च.
५) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान
पदव्युत्तर: सुमित जगताप – मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, धानोरे. दर्शन ढोमसे मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी धानोरे.
पदव्युत्तर: निवेदिता वाडीले – अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, अथर्व कुलकर्णी – कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च.
६) औषध आणि फार्मसी
पदव्युत्तर: ज्ञानेश्वरी ननावरे – केजेईआय ट्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे, श्रुती जगताप – अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी.
पदव्युत्तर: शितल शिंदे – नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे,
अमृता शाह – अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून-डॉ. श्रीकांत स्वामी,डॉ. धनेश पडवळ,डॉ. उर्मिला सुखदेवे,डॉ. अनिता सावळे,डॉ. संजय खोब्रागडे,डॉ. प्रतिमा पडघन,डॉ.संगिता मेटकर,डॉ. दीपाली धिवरे,डॉ.पवन पाईकराव,
डॉ. धनश्री बिरादार,डॉ. धैर्यशील घाडगे,डॉ. शैलजा जाधव,डॉ.मनोज गाढवे यांनी काम पाहिले.
विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
विभाग प्रमुख डॉ.सचिन दातखिळे, प्रा.नितीन महाले,आविष्कार समन्वयक डॉ.मंगेश होले,डॉ.शितल गायकवाड,प्रा.शुभम गडगे,प्रा.प्राजक्ता शिंगोटे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.डॉ.सचिन भालेकर, प्रा.डॉ.राहुल लोखंडे, प्रा.डॉ.विजयकुमार वाकळे, प्रा.सागर तांबे, प्रा.श्रद्धा खळदकर, प्रा. काजल वाळुंज,समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग प्रा.निर्मल कोठारी आणि प्रा. प्रियांका लोखंडे यांनी तसेच समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी आयोजन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संतोष घुले,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदिप गाडेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्राची पडवळ यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. कुलदीप रामटेके यांनी मानले.



