ताज्या घडामोडी

कै.सविता भोर या मातोश्रींच्या स्मरणार्थ येडेश्वर विद्यालयात वह्या वाटप 

 येडगाव: ( दि १५) प्रतिनिधी लहान वयातच मातृछत्र हरपल्याने झालेली जीवनाची वाताहत पेलवत येणाऱ्या परिस्थितीवर धैर्याने मात करत स्वतःचे जीवन घडवता घडवताआपल्या लहान भावाचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारी माणसे या युगात आजही आहेत,महान संस्कृती असणाऱ्या भारत देशात ही गौरवास्पद बाब आहे, मातृप्रेमाला पारखे झाल्यानंतर ज्या शाळेने या भावंडाना खरे मातृत्व दिले ,परिस्थितीवर मात करायला शिकविले ,व जीवनाची योग्य दिशा देऊन ताठ मानेने जगायला शिकविले त्या शिक्षकांच्या ,शाळेच्या कृतज्ञेत  राहून कै,सौ, सविता बबन भोर या मातोश्रीच्या  समरणार्थ त्यांचे चिरंजीव सुमित बबन भोर यांनी आपल्या तुटपुंज्या कमाईतून येडगाव येथील येडेश्वर विद्यालयामधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले सुमितने स्वतःच्या बळावर बी,ए केलेले असून , एन,सी,सी,चा विद्यार्थी आहे लहान भाऊ कुमार समीर बबन भोर हा नारायणगाव या ठिकाणी बी ,एस्सी, करत आहे याप्रसंगी मातोश्रीच्या आठवणींनी सर्वजण भावुक झाले होते

या कार्यक्रम प्रसंगी येडगावचे पोलिस पाटील  गिरीश बांगर, सामाजिक कार्यकर्ते राहुल वाघमारे  ,ग्रामपंचायत सदस्य,सागर नेहरकर,रवींद्र नेहरकर, प्रवीण नेहरकर,  ऋषीकेश भोर, वीरेंद्र बांगर,आकाश भोर, संदेश नेहरकर सामाजिक कार्यकर्ते राजुशेठ ढवळे उपस्थित होते,पोलिस पाटील गिरिष  बांगर यांनी सुमित व समीर ही  दोन भावंड परिस्थितीवर मात करून जीवनाची वाटचाल कशी करत आहेत हे सांगत असताना सर्वांचीहृदये हेलावून गेल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री, काकडे, ए, एस,यांनी सर्वच शिक्षक व  शिक्षकेतर आणि विदयार्थी यांच्या वतीने या दोघा भावाना उर्वरित आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस,ई, अभंग यांनी तर आभार श्री, एस, बी, कसार यांनी मानले

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!