ताज्या घडामोडी

एमआयटी, पुणे आणि रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामीण तादात्म्य कार्यक्रम संपन्न

 
आणे -( दि 7) प्रतिनिधी
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, पुणे आणि रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आणे, ता.जुन्नर, जि. पुणे येथे दि. ३० ऑक्टोबर २०२३ ते २ नोव्हेंबर २०२३ कालावधीमध्ये ग्रामीण तादात्म्य कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमांतर्गत वनराई बंधारा बांधणे, आश्रमशाळा भेट व विध्यार्थ्यांना दप्तरे, पुस्तके, टी-शर्टचे वाटप करणे, रंगदास स्वामी समाधी मंदिर दर्शन व माहिती आणि परिसरातील साफसफाई करणे, सायंकाळी गावकऱ्यांच्या सोबत भजन श्रवण व सहभाग, मशाल फेरी, रस्ता सुरक्षा अभियान, सर्वेक्षण, पवनचक्की, शेती, फळबागा, गायीचे गोठे या ठिकाणास भेट व अभ्यास, ग्रामपंचायत भेट व ग्रामसभेत उपस्थिती व अभ्यास, जनजागृती व संस्कृती संवर्धनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. रोटरी क्लब आणि गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे पारंपरिक वाद्ये वाजवून व फेटे बांधून जोरदार आणि उत्साहात स्वागत केले. यावेळी सरपंच सौ. प्रियांकाताई प्रशांत दाते, रंगदास स्वामी ट्रस्टचे अध्यक्ष – श्री. मधुकर दाते, उपाध्यक्ष – अनिल आहेर, विश्वस्थ – श्री विनायक आहेर, श्री. ज्ञानेश्वर दाते, सामाजिक कार्यकर्ते – प्रशांत दाते,  रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचे संस्थापक – श्री. महावीर पोखरणा, अध्यक्ष – श्री. विजयकुमार आहेर, उपाध्यक्ष – श्री. संभाजी हाडवळे, श्री. ज्ञानेश जाधव, श्री. पंकज चंगेडिया, श्री. रोहित नरवडे, श्री. तुषार आहेर आदी उपास्थित होते.सदर कार्यक्रमामध्ये विध्यार्थी आणि शिक्षक मिळून १४० जणांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या असोसिएट डीन – डॉ. प्रीती जोशी, प्रोग्रॅम डायरेक्टर – विशाल घुले, प्रोग्रॅम कॉर्डिनेटर- आशिष कसबे, डॉ. अपर्णा पाठक, स्वरदा चतुर्वेदी, डॉ. कौस्तुभ यादव यांनी भेटी दिल्या तर संपूर्ण आयोजनाची जबाबदारी श्री. अभिजीत चोरे, श्री. सन्मित सरकार, डॉ. बिष्णु महोपात्रा, डॉ. श्रेया बेरा, डॉ. सेजल यादव, विशाखा पेठकर, प्रविण शिंदे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. डॉ. श्री. विश्वनाथ डी. कराड सर आणि कार्यकारी अध्यक्ष श्री. राहुल विश्वनाथ कराड सर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ग्रामीण तादात्म्य कार्यक्रम कार्यक्रमाने निश्चितच’

 ग्रामीण आणि शहरी भागातील विचारांची देवाण घेवाण होऊन वैविध्यपूर्ण विकासाला चालना मिळेल, अशी भावना गावकरी आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.हा उपक्रम राबवताना विद्यापीठाचे कुलगुरू – श्री. आर. एम. चिटणीस सर आणि रजिस्ट्रार – श्री. गणेश पोकळे, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सचे डीन -प्रा. डॉ. संतोष कुमार आणि असोसिएट डीन – प्रा. डॉ. अक्षय धुमे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अशी माहिती रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचे अध्यक्ष  श्री. विजयकुमार आहेर आणि श्री. सत्यवान गागरे यांनी दिली.
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!