ताज्या घडामोडी

पत्नीचा निर्घुण खुन करणा-या आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

जुन्नर -( दि.१७) प्रतिनिधी
दरावस्ती घंगाळदरे जुन्नर येथे कौटुंबिक वादातून बायकोचा निघृण खून करून जंगलात फरार झालेलाआरोपीला महिन्याभराने जेरबंद करण्यात पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणा मधील फरार आरोपी शंकर बांबळे यास अटक करण्यात आली आहे
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की जुन्नर पोस्टे गु.र.नं ९२/२०२५ भा.न्या.सं कलम १०३(१), ११५(२), ३५२,३५१(२),३(५) नुसार दि.२१/३/२०२५ रोजी दाखल होता.फिर्यादी नामे राजश्री अवरिंद विरनक वय ५४ रा.मुलुंड गोरेगाव पश्चिम मुंबई यांनी फिर्याद दिली की त्या दि.२१/३/२०२५ रोजी त्यांच्याकडे कामाला असणारी अलका शंकर बांबळे हिच्या सोबत दरावस्ती घंगाळदरे जुन्नर येथे शंकर बारकु बांबळे याच्या घरी गेल्या होत्या.त्याठिकाणी शंकर बांबळे याचे त्याची पत्नी अलका शंकर बांबळे हिच्या सोबत कौटुंबिक वादातून भांडण झाले.सदर भांडणामध्ये शंकर बांबळे याला राग अनावर झाल्याने त्याने त्याची पत्नी अलका बांबळे हिच्यावर धारधार कोयत्याने वार करत तिचा खून केला.तसेच खून झाल्या नंतर शंकर बांबळे हा दुर्गादेवी, आंबे हातवीज, आहुपे घाटमाथा जंगलामध्ये पळून गेला.खून झाल्यापासून सदर आरोपी हा जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा देत होता.सदर चा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक श्री पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या.सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखे मार्फत तपास करत असताना आज रोजी गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मळाली की आरोपी शंकर बांबळे हा जुन्नर तालुक्यातील आहुपे जंगल घाट परिसरात लपून बसला आहे.मिळालेल्या माहिती नुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आहुपे जंगल परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासणी कामी जुन्नर पोस्टे च्या ताब्यात दिले आहे.सदर ची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक श्री पंकज देशमुख सो, अप्पर पोलिस अधीक्षक श्री रमेश चोपडे सौ, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री रवींद्र चौधर यांच्या मार्ग दर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलिस हवालदार राजु मोमीन. संदीप वारेड अक्षय नवले जुन्नर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मोरे
पोलिस शिपाई विजय जंगम यांनी केली आहे.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!