ताज्या घडामोडी

पिंपळवंडीत भर दिवसा घरफोडी पाच लाखांचा ऐवज लंपास

पिंपळवंडी – ( दि ४) प्रतिनिधी
पिंपळवंडी येथे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटामधील दोन लाख रुपये रोख व दागिने असा एकूण पाच लाख अडतीस हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला असल्याची घटना शनिवारी ( दि ३) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली
याबाबत मिळालेली माहिती अशी की पिंपळवंडी उंब्रज रस्त्यालगत वसंत तुकाराम वाघ यांचे घर असून वसंत वाघ हे काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते व त्यांची पत्नी शैला व मुलगा निखिल हे घराला कुलुप लावून घराच्या बाजूला असलेल्या शेतात कांदे झाकण्यासाठी गेले होते या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप काढून घरामध्ये प्रवेश केला व कपाटामधील एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे चार तोळे सोन्याचे मंगळसूत्र नव्वद हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील पाने नव्वद हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे ब्रेसलेट न ऊ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम कानातील सोन्याचे डूले बाळी ,चांदीच्या पट्टा व कमरपट्टा व. रोंख रक्कम १ लाख ६९ हजार असा एकूण पाच लाख अडतीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला त्यानंतर साधारणता अर्धा ते पाऊणतासने निखिल वाघ व शैला वाघ हे दोघेजण घरी आले त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले व घरातील कपाटामधील दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याचे दिसून आले त्यानंतर काही वेळाने या चोरट्यांनी कुकडी कालव्याजवळ संतोष फुलसुंदर यांच्या शेतात दागिन्यांची रिकामी पाकिटे
सापडली त्यानंतर संतोष यांनी याबाबत निखिल वाघ यांना माहिती दिली त्यानंतर निखिलववसंत वाघ यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली असून पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आणिल पवार करत आहे

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!