वडगावकांदळीत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा धाब्यावर : जादूटोण्याच्या प्रकारामुळे खळबळ
वडगाव कांदळी ( दि १५) प्रतिनिधी
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे हा कायदा चक्क धाब्यावर बसवून शेतजमिनीच्या वादामधुन जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

याबाबत मिळालेली माहिती अशी की येथील गट नंबर ११०० व ११०१ मधील शेतजमीन नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रितसर व कायद्यानुसार ॲड तुषार अरुण पाचपुते यांनी खरेदीखत करुन विकत घेतली होती ते याजमिनीची नांगरणी करण्यासाठी ट्रँक्टर घेऊन गेले असता त्यांना शेताच्या बांधावर असलेल्या एका बाभळीच्या झाड्याच्या खोडाशी गुलाल टाकून पूजा केलेले लिंबे व झाडाच्या खोडाला काळी बाहुली दिसून आली त्या बाहुलीला एक बिबवा त्यासोबत ॲड तुषार पाचपुते व. ज्यांची जमिन घेतली आहे ते सनिल कमलाकर पाचपुते या दोघांचे फोटो झाडाच्या बुंध्याला खिळे मारून ठोकन्यात आल्याचे दिसून आले तसेच त्यासोबत ॲड तुषार अरुण पाचपुते माझी जी जमिन घेतली आहे ती जमिन मला एकवीस दिवसांमध्ये परत माझ्या नावावर करुन द्यावी व मी कोर्टात जी केस लावली आहे त्यात माझ्या बाजूने निकाल लागला पाहिजे एकवीस दिवसात मला ती जमिन मिळाली पाहिजे शत्रुने त्यांना मदत करु नये त्यांनी माझ्या बाजूने बोलावे अशा आशयाचा मजकूर असलेली चिठ्ठी त्या बाभळीच्या झाडाच्या बुंध्याला खिळा मारून ठोकण्यात आली असल्याचे दिसून आले हा प्रकार शेतजमिनीच्या वादामधून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतानाही चक्क कायदाच धाब्यावर बसवून असे अघोरी प्रकार केले जात असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची किती कडक अंमलबजावणी का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे ग्रामीण भागात असेच अघोरी प्रकार घडत असतात असे असताना प्रशासनाकडून त्याकडे दूर्लक्ष केले जात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे



