निधनवार्ता – रमणशेठ दशरथशेठ काकडे

पिंपळवंडी -( प्रतिनिधी) जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कै.दशरथशेठ रावजी काकडे यांचे जेष्ठ चिरंजीव व पिंपळवंडी येथील सुभाष विद्या मंडळाचे अध्यक्ष व दानशुर व्यक्तीमत्व रमणशेठ दशरथशेठ काकडे ( वय ८० वर्ष) यांचे व्रुद्धपकाळाने निधन झाले त्यांनी पिंपळवंडी गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिले या काळामध्ये त्यांनी स्थळपहाणी करुन तंटे मिटविण्यात त्यांना यश आले होते त्यांनी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावाला दहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळवून दिला होता त्यांनी संत तुकाराम महाराज सेवा समितीच्या माध्यमातून संत सावळेरामबबा पिंपळवंडी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले या काळात त्यांचे मोठे योगदान दिंडी सोहळ्यास लाभले मळगंगा यात्रा कमिटी नवरात्र उत्सव अशा विविध ठिकाणी काम करत त्यांनी सामाजिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटविला होता त्यांचा गावच्या प्रत्येक सामाजिक कार्यात सहभाग होता एक दानशूर व्यक्तीमत्व म्हणूण त्यांची ओळख होती त्यांच्या निधनामूळे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते
त्यांच्यामागे पत्नी दोन मुले व एक मुलगी असा परीवार आहे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ काकडे राहूलशेठ काकडे व रोहिणीताई रोकडे यांचे ते वडील होते




