पिंपळवंडीत बिबट्याचा कालवडीवर हल्ला

पिंपळवंडी ( प्रतिनिधी) येथील काकडपट्टा शिवारात बिबट्याने कालवडीवर हल्ला करून जखमी केली असल्याची घटना शुक्रवारी ( दि.२७) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली
येथील शेतकरी मयूर नेताजी वाघ यांच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला व गोठ्यात असलेल्या कालवडीवर हल्ला करून जखमी केले त्यानंतर मयूर नेताजी वाघ यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला
या घटनेची माहिती केल्यानंतर आहे वनविभागाचे वनपाल अनिल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे ज्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे त्या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आला होता या कॅमेऱ्यात बिबट्या सावजाच्या मागावर आला बिबट्याने पिंजऱ्याला फेरी मारून परत पाठीमागे गेला जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या आहे असून वन खाते ठिकठिकाणी पिंजरा लावते मात्र बिबट्या पिंजऱ्यात येत नाही
बिबट्या हुशार झाल्यामुळे पिंजऱ्यात जात नाहीत त्यामुळे बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी मयूर नेताजी वाघ यांनी केली आहे



