पिंपळवंडी येथे बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला : तरुण मेंढपाळ जखमी

पिंपळवंडी ( दि 9) रस्त्याने जात असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यानंतर आरडाओरडा करणाऱ्या एका मेंढपाळ तरुणावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात हा मेंढपाळ जखमी झाला आहे ही घटना गुरुवारी ( दि.९) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळवंडी येथील काकडपट्ट शिवारात घडली या घटनेत शंकर शिवाजी टिखूळे ( वय २५वर्ष राहणार शिरापूर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर)हा मेंढपाळ तरुण जखमी झाला आहे
पिंपळवंडी (तालुका जुन्नर) येथील काकडपट्टा शिवारात गेल्या काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून आठ दिवसापूर्वी येथील शेतकरी मयूर नेताजी वाघ यांच्या कालवडीवर हल्ला करून जखमी कले होते व त्यानंतर पुन्हा दोन ते तीन दिवसांनी बिबट्याने त्यांच्या मेंढी वर हल्ला करून जखमी केले होते व त्यावेळी भर दुपारी अकरा वाजवण्याच्या सुमारास बिबट्याने मयूर नेताजी वाघ यांच्या घराच्या दरवाजाला धडका दिल्या होत्या ही घटना ताजी असतानाच मयूर वाघ यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रस्त्यावरून सुभाष बाळू तांबे व चिमाजी सोन्नर राहणार शिरापूर पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील मेंढपाळ मेंढ्या घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या वाड्याकडे जात असताना रस्त्याच्या कडेला डबा धुऊन बसलेल्या बिबट्याने कळपातील एका बकरीवर अचानक हल्ला केला व त्या बकरीला घेऊन जात असताना शंकर टीखुळे या मेंढपाळाने आरडाओरडा केला हा आरडाओरडा करत असताना बिबट्या अचानक मागे फिरला वत्या तरुणाच्या पायाच्या पंजावर बिबट्याने पंजा मारला बिबट्या त्याच्या अंगावर बसला त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचवेळी त्या ठिकाणी हजर असलेले सुभाष तांबे यांनी त्यांच्या हातात असलेल्या काठीने बिबट्याला जोरदार फटका मारला त्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला
शंकर हा बिबट्याच्या हल्ल्यामधून थोडक्यात बचावला असून तो या घटनेमुळे अत्यंत भयभीत झाला होता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आळे वनविभागाचे वनपाल अनिल सोनवणे वनरक्षक ज्ञानेश्वर साळुंखे वन मजूर भिवाजी खर्गे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमी झालेला मेंढपाळ शंकर टीखुळे यस प्राथमिक उपचार करण्यासाठी पिंपळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यास नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार केले
गेल्या एक महिन्यापासून पिंपळवंडी परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहे बिबट्याचे सातत्याने होणारे हल्ले ही चिंतेची बात झाली असून यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी पिंपळवंडी ग्रामस्थांकडून केली जात आहे



