पुणे शहर व जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षपदी अनिल तात्या मेहेर यांची निवड

नारायणगाव (प्रतिनिधी) पुणे शहर व जिल्हा शिक्षण संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षपदी ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष मा. श्री.अनिल मेहेर यांची निवड झाली आहे.
नुकतीच संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या सन २०२५ ते सन २०२८ या कालावधीसाठी नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या शाहू कॉलेज,पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये श्री.मेहेर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
शिक्षण संस्थांच्या कार्यक्षम व पारदर्शक कारभारासाठी व शैक्षणिक संस्थाचालकांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी श्री.अनिल मेहेर यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या निवडीमुळे शिक्षण मंडळाच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल,असा विश्वास सर्व संचालकांनी व्यक्त केला.तसेच शिक्षण मंडळ सल्लागार मंडळाच्या कार्यकारी सचिवपदी गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नारायणगावचे उपप्राचार्य श्री. हनुमंतराव काळे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त श्री. प्रकाश पाटे, सौ. मोनिका मेहेर, अध्यक्ष श्री. सुजित खैरे, कार्यवाह श्री. रविंद्र पारगावकर, सर्व संचालक, विविध शाखांचे प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिंनदन केले.
या बैठकीमध्ये शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. विजय कोलते, उपाध्यक्षपदी श्रीमती. प्रमिलाताई गायकवाड, खजिनदारपदी श्री. महेश ढमढेरे, सचिवपदी श्री. संग्राम कोंडे, सहसचिवपदी श्री. वीरसिह रणसिंग, समन्वयकपदी डॉ. प्रसन्नकुमार देशमुख व श्री. शिवाजीराव खांडेकर तर सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. विलास पाटील, कार्यकारी अध्यक्षपदी श्री. देवराम मुंढे व सल्लागारपदी श्री. सचिन भोर व श्री. शिवाजीराव चाळक यांची निवड करण्यात आली.या वेळी संस्थाचालक शिक्षण मंडळाचे संचालक श्री. प्रदीप वळसे पाटील, अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, श्री. भाऊसाहेब ढमढेरे, श्री. संग्राम मोहोळ, श्री. महादेव कांचन आदि मान्यवर व जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



