पंजाबमधील पूरग्रस्तांना एक लाखाची मदत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री निधीसाठीही मदत देणार

मुंबई-(दि.१४) प्रतिनिधी
पंजाबमध्ये उसळलेल्या महापुरात उध्वस्त झालेल्या नागरिकांना मदतीचा हात म्हणून विविध संस्थांनी एकत्र येत सुप्रसिद्ध लेखक डाॅ .विजय पंडित यांच्या नेतृत्वाखाली एक लाख रूपयांची मदत केली आहे.या संस्था लवकरच मुख्यमंत्री मदत निधीमध्ये देखील मदत देणार असल्याचे डाॅ.पंडीत यांनी सांगीतले.
पंजाब मध्ये आलेल्या महापूरामुळे दळणवळण व्यवस्था बाधित झाली असून येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या नागरिकांना मदत म्हणून ओम शिवम सत्संग ट्रस्ट, संस्कृती संगम गोल्डन ग्रुप, विश्व ब्राह्मण समाज, व एम जे चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थांनी आपल्या मदतीचा एक लाख रूपयांचा धनादेश पंजाब मधील एक गाव दत्तक घेणा-या श्री गुरुसिंह सभेचे अध्यक्ष अमरसिंह नाखुदा यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी
रामचंद्र पांडे, विजय त्रिपाठी, दिलबाग सिंग, अरुण दुबे, सतनाम सिंग, श्रीचंद केसवानी, सुनील कुकरेजा, विश्वंभर द्विवेदी, शिवानी गोरे, मनोज तिवारी, संगीता चिखले, नाना चिखले, गुलाब ताई कोकणे, सुरेश गुप्ता, बेबी आपा, मनीषा राव, श्याम तुळवे, अरविंद जोशी, स्वप्नील करपे इत्यादी मान्यवर समाजातील उपस्थित होते.
महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात उद्भवलेल्या पूरग्रस्ताच्या मदतीसाठी लवकरच मुख्यमंत्री मदत निधीमध्ये मदत देण्यात येणार असल्याची माहीती डाॅ.विजय पंडित यांनी दिली.



