ताज्या घडामोडी

पिंपळवंडीत यशवंत नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते गुरुवारी उदघाटन 

यशवंत गौरव पुरस्कार सोहळा व भव्य शेतकरी मेळावा.

पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुतन मुख्य कार्यालय इमारतीचा उद्घाटन समारंभ यशवंत गौरव पुरस्कार प्रदाण सोहळा व भव्य शेतकरी मेळाव्याचे गुरुवारी (दि.२५) दुपारी तीन वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे प्रकाश जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे वाघ यांनी सांगितले याबाबत माहिती देताना ते पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील द्राक्ष, ऊस, फुले, फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या माध्यमातून नामदार अजितदादा पवार यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या अडचणींच्या व्यथा मांडणार असल्याचे सांगितले

दरवर्षी यशवंत पतसंस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा यशवंत पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे या कार्यक्रमात अध्यात्मिक क्षेत्रात प्रबोधन करणारे ह.भ.प.तुळशीराम महाराज सरकटे साहित्य क्षेत्रातील जेष्ठ ग्रामीण कथा व कादंबरीकार प्रा.द.स.काकडे व शिवांजली साहित्य चळवळी मधून नवोदित कविंना प्रोत्साहन देणारे कवी शिवाजीराव चाळक व सामाजिक कार्यकर्ते बबन वामनराव हाडवळे यांचा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे वाघ यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ उपाध्यक्ष फकीर इनामदार जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे बाजार समितीचे  माजी सभापती रघुनाथ लेंडे पंचायत समितीचे सदस्य शाम माळी  माजी उपसभाती शिवाजीराव काकडे माजी सरपंच दादाभाऊ काकडे मंगेश काकडे आर्थिक सल्लागार लक्ष्मण मंडलीक मुख्य कार्यकारी अधिकारी  रंजना मंडलीक संचालक संजय किसनराव वाघ बाळासाहेब खंडू काकडे भरत शिंदे प्रकाश तोतरे रमेश कोकाटे राजाराम घोटणे सबाजी लेंडे शरद फापाळे तज्ञ संचालक अशोक डूंबरे संचालिका वैशाली काकडे जोस्ना लेंडे तसेच संस्थेचे सर्व सल्लागार उपस्थित होते
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!