ताज्या घडामोडी

मांजरवाडी येथील व्रुद्ध महिलेचा खुन करणा-या दांपत्यास अटक : स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांना यश


नारायणगाव -( दि १४) प्रतिनिधी

खोडद परीसरात शेतमजूरीचे काम मिळवून वृद्ध महिलेचा खून करून जबरी चोरी करणाऱ्या दांपत्याला अवघ्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, व नारायणगाव पोलीस यांना यश आले आहे या प्रकरणी  शिवम ऊर्फ संकेत शाम श्रीमंत(वय २१ वर्षे )व पुनम संकेत श्रीमंत (वय २० वर्षे, दोघे मुळ रा. गजानन नगर, चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा) या दांपत्यास अटक करण्यात आली आहे

याबाबत मिळालेली  माहिती अशी की दिनांक  १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ०२/३४ वा पुर्वी मौजे मांजरवाडी ता. जुन्नर, जि. पुणे गावातील धनवट येथील महिला नामे सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे वय ७० वर्षे या एकटया घरी असताना त्यांचा त्यांचे राहते कोणतरी अज्ञात व्यक्तीने गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला होता. त्यांचे घरातील कपाट उचकटलेले व कपडे अस्ताव्यस्त होते. सदर प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६५/२० भा.दं.वि.का.क. ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला होता.

सदरचा गुन्हा हा दिवसा ग्रामीण भागातील लोकवस्तीत घडल्याने गुन्हयाचे गांभीर्य वाढले होते. मा. पंकज देशमुख साो., पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे साो. विभाग, यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या. स्था.गु.शा.चे पथक व नारायणगाव पो.स्टे. कडील पथके तयार करून घटनास्थळाकडे येणारे सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासण्यात आले.तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पो.स.ई. अभिजित सावंत, पो.हवा. दिपक साबळे, विक्रम तापकीर, संदिप वारे, अक्षय नवले या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, गुन्हा घडले परीसरात शेत मजुरीसाठी वाशिम जिल्हयातील एक पती-पत्नीचे जोडपे आले होते, ते जोडपे अचानक काही दिवसांपूर्वी निघुन गेले होते, परंतु ते पती-पत्नी गुन्हा घडलेल्या धनवटमळा परीसरात घटनेच्या दिवशी वावरताना दिसून आले होते. अशी बातमी मिळाल्याने संशयित जोडप्याची माहिती मिळवून स्था. गु.शा. चे पथक नारायणगाव पो कडील स्टाफ मदतीला घेवून वरीष्ठांचे परवानगीने वाशिम जिल्हयाकडे रवाना झाले. दरम्यान संशयित पती-पत्नी हे अहमदनगर एस.टी. स्टैंड परीसरात थांबलेले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना त्या ठिकाणाहून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांचे नाव १) शिवम ऊर्फ संकेत शाम श्रीमंत, वय २१ वर्षे. व पुनम संकेत श्रीमंत, वय २० वर्षे, दोघे मुळ रा. गजानन नगर, चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा, यांनी नमुद गुन्हा केल्याचे व मयत सुलोचना टेमगिरे यांचे राहते घरातून त्यांचा मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. त्यांचेकडून मयत सुलोचना टेमगिरे यांचा चोरी केलेला मोबाईल हस्तगत करणेत आला आहे. त्यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिन्या बाबत त्यांचेकडे चौकशी चालू आहे. दोन्ही आरोपींना मा. जुन्नर न्यायालयात हजर करणेत येणार असून पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे.

  सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधी. श्री. रमेश चोपडे साो, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाख स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,* नारायणगाव पो.स्टे. चे सपोनि महादेव शेलार, स्था.गु.शा. चे सपोनि राहुल गावडे, पोसई अभिजीत सावंत नारायणगाव पो.स्टे. चे पोसई सनील धनवे, स्था. गु.शा.चे पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीण, अतुल डेरे, विक्रम तापकिर मंगेश थिगळे, अक्षय नवले, संदिप वारे, शैलेश वाघमारे, तुषार भोईटे, संतोष कोकणे, अमोल शेडगे, धीरज जाधव, सत्यम केळकर, निलेश शिंदे, अक्षय सुपे, दगडू विरकर, सचिन सातपुते, म. स फौ. तनश्री घोडे यांनी केली आहे.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!