ताज्या घडामोडी

बिबट व मानव संघर्ष उपाययोजना संदर्भात बैठक संपन्न

.

ओतुर -( दि १६) कैलास बोडके

वनभवन सेनापती बापट रोड पुणे या ठिकाणी बिबट मानव संघर्ष उपाययोजना सुचविण्यासाठी मा. विधानसभा सदस्याची गठीत समिती यांची बैठक पार पडली सदर बैठकीसाठी समितीचे सदस्य अॅड. अशोक बापू पवार, आमदार विधानसभा सदस्य शिरुर, श्री. अतुल बेनके विधानसभा सदस्य जुन्नर समिती सदस्य सचिव श्री.एन. आर. प्रविन मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे.श्री.राम धोत्रे विभागीय वनअधिकारी (दक्षता) श्री. अमित भिसे सहाय्यक वनसंरक्षक (वसअनि) जुन्नर श्री. प्रदिप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर श्री. वैभव काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी ओतुर श्री. प्रताप जगताप वनपरिक्षेत्र अधिकारी शिरुर हे उपस्थिीत होते.

बैठकी दरम्यान श्री. अमित भिसे सहाय्यक वनसंरक्षक (वसअनि) जुन्नर यांनी जुन्नर वनविभागा अंतर्गत मानव बिबट संघर्षाबाबत सुरु असलेल्या विविध उपाययोजना बाबत माहिती सादर केली. यानंतर श्री. अतुल बेनके विधानसभा सदस्य जुन्नर यांनी मानव बिबट समस्या निवारणसाठी वनविभागाने शासनास पाठविलेले प्रस्ताव जसे कि, दिवसा वीज पुरवठा, बिबट वन्यप्राण्याची नसबंदी, चिबट रेस्क्यू टिमचे बळकटीकरण इत्यादी मुदयाबाबत शासनास वनविभागाच्या बिबट समस्या निवारणासाठी वनविभागासाठी पिंजरे वाहने खरेदीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासित केले. तसेच जिल्हा वार्षीक नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करुन देण्याबाबत आश्वासित केले. यानंतर अॅड. अशोक बापू पवार , विधानसभा सदस्य शिरुर यांनी वनविभागाचे योजनेचे कौतुक करुन त्याच्या बळकटीकरणासाठी व बिबट पकडण्यासाठी नविन सुधारणा करुन शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या पिंज-यात पकडलेले बिबटे लांबच्या अभयाअरण्यात किंवा दुस-या राज्यात पाठविणे बाबत वरिष्ट पातळीवर चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर समिती सदस्य सचिव श्री. एन. आर. प्रविन मुख्य वनसंरक्षक प्रा पुणे यांनी सर्व मागण्याची नोंद घेवुन शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे सर्वानुमते ठरले. नंतर. श्री.राम धोत्रे विभागीय वनअधिकारी (दक्षता) यांनी सर्वाचे आभार मानून मिटींगची सांगता झाली.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!