जिल्हा सत्र न्यायालयाने व्हाॅटसॲप काॅलींगद्वारे केली सुनावनी : पक्षकारास नुकसानभरपाई मंजूर

पिंपळवंडी -( दि १) प्रतिनिधी
राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयाने व्हाॅटसॲप काॅलींगद्वारे सुनावणी घेत अपघातात म्रुत्यूमुखी पडलेल्या एका चोबीस वर्षीय तरुणाच्या जेष्ठ नागरिक असलेल्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मंजूर करुन दिली
याबाबत माहिती अशी की न्याय मिळविण्यासाठी एरवी पक्षकारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते मात्र जेष्ठ नागरिकांना न्यायालयात न जाता त्यांना व्हाॅटसॲप काॅलींगद्वारे सुनावणी घेऊन न्याय देण्याचे काम जिल्हा न्यायालयाने केले आहे.सन २०१७ मध्ये पुणे नाशिक महामार्गावर महेंद्र भिमाजी अडसरे ( वय २४ वर्ष रा नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे) या तरूणाचा अपघाती म्रुत्यू झाला होता त्यानंतर या तरूणाच्या पत्नीने नुकसानभरपाई मिळविण्यासाठी राजगुरूनगर येथे जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता दिनांक २७ जुलै रोजी सुनावणीसाठी म्रुत व्यक्तीची पत्नी व मुलगा जिल्हा न्यायालयात हजर झाले मात्र त्या मयत तरुणाचे आई व वडील व्रुद्ध असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर होता आले नाही ही बाब लक्षात घेऊन पॅनलप्रमुख न्यायमूर्ती बी पी क्षिरसागर व ॲड.अतुल गुंजाळ यांना विनंती अर्ज करुन सदर व्यक्तीचे म्हणने ऐकूण घेऊन या कुटुंबाला न्यायालयाने वीस लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर केली सदर व्हाॅटसॲप व्हिडिओ काॅलला अर्जदाराचे वकील ॲड. तुषार पाचपुते व जाब देणार नॅशनल इन्स्शुरस कंपणी यांचे वकील ॲड .अय्यर यांनी संम्मती दर्शविली व त्यास पॅनलप्रमुख मे.मोटार अपघात न्याय प्राधिकरण यांचे प्रमुख बी पी क्षिरसागर व ॲड अतुल गुंजाळ यांनी त्यास मान्यता दिली व सदर प्रकरण निकालात काढण्यात आले अशा प्रकारे न्याय देण्यासाठी न्यायालय अर्जदार यांचे म्हणने ऐकून घेण्यासाठी व त्याला न्याय देण्यासाठी न्यायालयाची एक वेगळी बाजू महालोकादालतमध्ये पहायला मिळाली



