जुन्नर तालुक्यात दिपआमवस्या अर्थात गटारी आमवस्या साजरी

जुन्नर ( दि ४) प्रतिनिधी जुन्नर तालुक्यात दिपपुजन करुन दिप आमवस्या अर्थातच गटारी आमवस्या प्रत्येक घरोघरी साजरी करण्यात आली
आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झालं असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं.
जुन्नर तालुक्यात प्रत्येक घरोघरी आषाढ अमावस्या रविवारी साजरी करण्यात आली यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असं म्हणतात ग्रामीण भागात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेऊन हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते असे मानले जाते



