प्रगतशिल शेतकरी व द्राक्ष बागायतदार संजय वाघ यांचा आयडीयल फार्मर ॲवाॅर्ड पुरस्काराने सन्मान

पिंपळवंडी -( दि ६) प्रतिनिधी
पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथील प्रगतशिल शेतकरी संजय किसनराव वाघ यांना आयडीयल फार्मर अवार्ड हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
आयडीयल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने क्रुषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आयडील फार्मर ॲवार्ड हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते सन २०२४ या वर्षीच्या या पुरस्कारासाठी जुन्नर तालुक्यामधुन पिंपळवंडी येथील प्रगतशिल शेतकरी संजय किसनराव वाघ यांची निवड झाली होती

ओझर या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला यावेळी राहूरी क्रुषी विद्यापीठाचे कुलगुरु कर्नल डाॅ जी पी पाटील यांच्या शुभहस्ते व आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली व नितीन बानगुडे पाटील विघ्नहर साखर काखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर अप्पर पोलिस आयूक्त मनोज पाटील कोकण क्रुषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ एस डी सावंत प्रवीण देशमुख डाॅ महानंद माने प्रवीण देशमुख धर्मेंद्र फाळके सभापती संजय काळे देवदत्त निकम आणिलतात्या मेहेर काकासाहेब कोयटे यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष व जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेवशेठ वाघ नारायणगावचे सरपंच योगेशभाऊ पाटे विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे माऊलीशेठ खंडागळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
संजय वाघ यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष व जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेवशेठ वाघ आणि पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे



