ताज्या घडामोडी

शिरूर मतदारसंघातून कोण होणार खासदार ? चक्क पाच लाख रुपयांची लागली पैज 

 

 

ओतूर -: ( रमेश तांबे )
शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्यात लक्षवेधी लढत होणार असून, या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
यातच जुन्नर तालुक्यातील आमदार अतुल बेनके यांचे विश्वासू निकटवर्तीय समर्थक,उदापूर डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य,बबनराव तांबे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हेच निवडून येणार असून यासाठी पाच लाख रूपयांची पैज लावलेली आहे. गेल्या पाच वर्षात गायब झालेले विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे कोणी समर्थक पैज लावण्यात तयार असतील,तर त्यांनी डिंगोरे येथे येऊन माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन  केले आहे. तसेच माझ्याबरोबर पैज लावणाऱ्या व्यक्तीने दोन पंच ( साक्षीदार ) समक्ष माझे पाच लाख रूपये आणि समोरच्या व्यक्तीचे पाच लाख रूपये असे दहा लाख रूपयांची रक्कम गावातील संस्थेमध्ये ठेवावी आणि पैज लावलेला ज्या कोणी व्यक्तीचा उमेदवार निवडून येईल, त्या व्यक्तीला दोघांचेही मिळून दहा लाख रूपये देण्यात येतील असे श्री तांबे यांनी सांगून ते
पुढे म्हणाले की,विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे हे गेल्या पाच वर्षात मतदार संघात फिरकलेच नाहीत.आणि मतदार संघात कुठलीही कामे केलेली नाहीत.याउलट मागील पाच वर्षांपूर्वी पराभूत झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारसंघात नागरिकांशी सतत संपर्क ठेवून सत्तेत नसताना देखील त्यांनी मतदार संघात निधी उपलब्ध करून,विकास कामे केलेली आहेत.माजी खासदार आढळराव यांची जमेची बाजू असने, शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांचा प्रतिसाद पाहता, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हेच निवडून येतील असा विश्वास व्यक्त करून पाच लाख रूपयाची पैज लावलेली आहे.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!