ताज्या घडामोडी
पिंपळवंडीत यशवंत नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते गुरुवारी उदघाटन
यशवंत गौरव पुरस्कार सोहळा व भव्य शेतकरी मेळावा.

पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुतन मुख्य कार्यालय इमारतीचा उद्घाटन समारंभ यशवंत गौरव पुरस्कार प्रदाण सोहळा व भव्य शेतकरी मेळाव्याचे गुरुवारी (दि.२५) दुपारी तीन वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे प्रकाश जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे वाघ यांनी सांगितले याबाबत माहिती देताना ते पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील द्राक्ष, ऊस, फुले, फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या माध्यमातून नामदार अजितदादा पवार यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या अडचणींच्या व्यथा मांडणार असल्याचे सांगितले




