ताज्या घडामोडी

चाळकवाडी टोलनाक्यावर विद्यार्थ्यी व टोलकर्मचारी यांच्यामध्ये वादावादी : मनसेच्या आंदोलनानंतर टोल कर्मचाऱ्यांची माफी 

पिंपळवंडी -( दि १७) प्रतिनिधी

चाळकवाडी टोलनाक्यावर टोल भरण्याच्या वादामधुन महाविद्यालयातील विद्यार्थी व टोल कर्मचारी यांच्यात राडा झाला त्यानंतर मनसेने टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर अखेर पडदा पडला

याबाबत माहिती अशी की पुणे येथील सिंहगड स्प्रिंगडेलचे विद्यार्थी कब्बडी खेळण्यासाठी आळे ( ता जुन्नर) गेले होते ते परत पुण्याकडे जात असताना चाळकवाडी येथील टोलनाक्यावर विद्यार्थी व टोल कर्मचारी यांच्यात वादावादी झाली या वादावादीचे रूपांतर मारहाणीत झाले  यावेळी टोल कर्मचाऱ्यांकडून या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली असल्याचे समजते त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे तान्हाजी तांबे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसह टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन केले यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे मकरंद पाटे यांनी  सांगत टोल कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल व  अशी मागणी केली यावेळी आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सांगितले की सदर बस आळेफाट्याकडे जात असताना या बसव टोल हा कमी दराचा फाडला गेला होता व परत येत असताना तो जास्त फाडल्यामुळे विद्यार्थ्यांचा गैरसमज झाला व मधून ही वादावादी झाली असल्याचे सांगितले अखेर टोल कर्मचाऱ्यांनी यापुढे टोलवरुन कुणालाही मारहाण करण्यात येणार नाही तसे झाले तर आमच्यावर गुन्हे दाखल करावेत असे सांगत झालेला प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली  यावेळी आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक सुनिल बडगुजर आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!