ओमकार बागुल याची करसहाय्यक व महसूल सहाय्यक पदावर नियूक्ती :पिंपळवंडी ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

पिंपळवंडी ( दि २७) लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथील ओमकार बागुल याची कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक या दोन पदांवर निवड झाली जिद्द व चिकाटी आणि अभ्यासात सातत्य या जोरावर ओमकारने यश मिळविले आहे

त्याचे प्राथमिक शिक्षण पिंपळवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माध्यमिक शिक्षण श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज व उच्च माध्यमिक शिक्षण रा.प.सबनीस ज्युनिअर काॅलेजमध्ये झाले पुणे येथे त्याने इंजिनारींगची पदवी घेतली या यशाबद्दल त्याचा पिंपळवंडी जिल्हा परिषद शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक हनुमान हांडे श्रीकांत भालेराव जया गोर्डे मनीषा भालेराव पोलिस पाटील इरफान तांबोळी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाणेकर टी आर वामन आनंद मोरे मंगेश भोसले राजाराम घोटणे चंद्रकला घोटणे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते



