ताज्या घडामोडी
पिंपरीपेंढारमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार : संतप्त ग्रामस्थांनी वनअधिकाऱ्यांना घेतले फैलावर
पिंपरीपेंढार -( दि १०) कैलास बोडके
पिंपरीपेंढार येथील गाजरपट शिवारात बाजरीच्या शेतात राखन करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला असल्याची घटना शुक्रवारी ( दि १०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे गेल्या पाच दिवसात हा तिसरा हल्ला आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
नानुबाई सीताराम कडाळे ( वय ४५ वर्ष रा चासपिंपळदरी ता संगमनेर जि अहमदनगर सध्या रा.पिंपरीपेंढार ता जुन्नर जि पुणे ) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की पिंपरीपेंढार येथील गाजरपट शिवारात राजेश प्रभाकर पडवळ यांची शेती असून या शेतात नानुबाई यांनी बाजरी केली होती या आज शुक्रवारी ( दि १०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बाजरीच्या शेतात राखन करत असताना बिबट्याने या महिलेवर अचानक हल्ला करुन ठार केले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले बिबट्याचे सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे येथील ग्रामस्थ चांगलेच अक्रमक झाले असून जोपर्यंत मुख्यमंत्री मंत्री या ठिकाणी येत नाहीत तो पर्यंत म्रुतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नसनुबाई यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंपळवंडी परिसरातील लेंडेस्थळ काळवाडी काकडपट्टा या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता रविवारी ( दि ४) लेंडेस्थळ शिवारात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला केला होता त्यामध्ये ही महिला गंभीर जखमी झाली आहे या घटनेनंतर बुधवारी ( दि ८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काळवाडी येथे एका आठ वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले होते या दोन्हीही घटना ताज्या असतानाच गुरूवारी ( दि ९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काकडपट्टा शिवारात बिबट्याने कालवडीवर हल्ला केला होता या सर्व घटना ताज्या असतानाच आज शुक्रवारी ( दि १०) सकाळी पुन्हा पिंपरीपेंढार येथे बिबट्याने महिलेवर हल्ला करुन ठार केले गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंपळवंडी काळवाडी व पिंपरीपेंढार परिसरात सातत्याने बिबट्याचे हल्ले होत आहेत त्यामुळे नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत




