ताज्या घडामोडी

बेल्हे येथील समर्थ फार्मसीमध्ये राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा उत्साहात संपन्न

बेल्हे ( प्रतिनिधी) समर्थ रूरल एज्युकेशनल इंस्टिट्यूट संचलित, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे व इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (आयपीए) स्थानिक शाखा आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील ३५ संघ सहभागी झाले होते. स्पर्धा दोन भागात घेण्यात आली. प्रथम फेरी मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये उत्तीर्ण झालेले स्पर्धेक पुढील फेरीसाठी पात्र ठरले स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
डी. फार्मसी
प्रथम क्रमांक:-रौंधळ साक्षी संतोष व शेख अप्सा अब्दुल
(विशाल जुन्नर सेवा मंडळ, इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी, आळे)
द्वितीय क्रमांक:- केंबारी पायल वनील व तोडकर अंकिता ज्ञानदेव (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे)
तृतीय क्रमांक:-डोईफोडे प्रसाद नामदेव व यादव स्नेहा अर्जुन
(समर्थ इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी,
बेल्हे)
उत्तेजनार्थ:-जोरी वैष्णवी अरुण व पिंगळे अश्विनी संतोष
(समर्थ इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी,
बेल्हे)
बी. फार्मसी प्रथम क्रमांक:-भिसे गोरक्षनाथ पोपट व धामणे तन्मय राहुल
(विद्यानिकेतन इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी,बोटा)
द्वितीय क्रमांक:-होगे विकी नामदेव व दुर्गे सागर भुजंग (सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी,शिरूर)
तृतीय क्रमांक:-येनारे रेणुका प्रकाश व भोरे दीक्षा अंबरुषी
(सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी,शिरूर)
भांडारकर प्राजक्ता कैलास व गोरडे सानिका हरिश्चंद्र (विशाल इंस्टिट्यूट ऑफ फार्मासुटीकल एज्युकेशन अँड रिसर्च,आळे )सर्व विजेत्या स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य लक्ष्मण घोलप,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर व डॉ.शरद पारखे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा समन्वयक डॉ.बिपीन गांधीं,विभागप्रमुख प्रा.नितीन महाले,डॉ.मंगेश होले,आयपीए समन्वयक अजय भागवत,प्रा.अश्विनी नेहे,प्रा.भैरवी गायकर,प्रा.आकांक्षा हांडे यांनी आयोजनाची जबाबदारी पार पडली.शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी गायकवाड यांनी तर आभार डॉ.संतोष घुले यांनी मानले.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!