जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळवंडी येथे सुसज्ज संगणक लॅबचे उद्घाटन

पिंपळवंडी ( प्रतिनिधी) पिंपळवंडी तालुका जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन वर्षाच्या अवचित्य साधत स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख करून देण्यासाठी सुसज्ज अशा संगणक लॅब चे उद्घाटन पिंपळवंडी गावचे सरपंच मेघाताई काकडे उपसरपंच पवार ग्रामपंचायत सदस्य स्वातीताई काकडे माजी पंचायत समिती सभापती संगीताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक माणिक बोराडे यांनी दिली युविक एज्युकेशन ओतूर संस्था पालक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने संगणक शिक्षणाचे धडे इयत्ता पहिली ते चौथी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक बोराडे यांनी सांगितले ग्रामपंचायतच्या माध्यमातून अवश्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच मेघाताई काकडे यांनी दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप लेंडे गणेश फुलसुंदर सचिन ठाणेकर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष टीआर वामन गायकवाड उमेश शिरसागर आनंद मोरे विद्यमान अध्यक्ष सचिन पवार सदस्य इनामदार जितेश पवार नवनाथ जाधव इम्रानभाई तांबोळी शैला वाकचौरे माजी विद्यार्थी पालक महिलावर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य पालक शिक्षक वर्ग श्रीकांत भालेराव जया गोरडे मनीषा भुजबळ आदींनी सहकार्य केले यावेळी विद्यार्थ्यांना नववर्षानिमित्त मीष्ठांन भोजन देण्यात आले



