ताज्या घडामोडी

पत्रकार संदीप उत्तर्डे यांना शिवीगाळ करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे वर कडक कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी : जुन्नर तालुक्यातील पत्रकारांनी अक्षय बोऱ्हाडेचा केला निषेध .

जुन्नर -( दि २०) प्रतिनिधी
तीन वर्षापूर्वी दिलेल्या बातमीचा राग मनात धरून पत्रकार संदीप उत्तर्डे यांना मोबाईल वरून शिवीगाळ करून दमदाटी केल्या करणारे तथाकथित समाजसेवक अक्षय बोऱ्हाडे यांचेवर कारवाई करून अटक करण्यात यावी , या मागणीसाठी जुन्नर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी काळ्या फीत लावून जुन्नर शहरातून मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला .

दरम्यान , जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली . यावेळी चौधर म्हणाले कि, अक्षय बोऱ्हाडे हा गुन्हेगारी प्रवृत्ती आहे . निश्चितच त्याच्यावर योग्य त्या कलमांद्वारे कारवाई करण्यात येईल. पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई होत असेल तर सरकारी वकील यांचे मार्गदर्शन घेऊन त्या कलमाद्वारे कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पत्रकार बांधवाना दिले . यावेळी जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर हे उपस्थित होते .

तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर अक्षय बोऱ्हाडे यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना पती बोऱ्हाडे याचेवर बाहेरख्यलीपणाचे पुरावे देत , आपली हि छळवणूक कशी केली याचीही माहिती दिली होती . त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तो व्हिडिओ जाहीर केला होता . तीन वर्षानंतर या घटनेचा राग मनात धरून अक्षय बोऱ्हाडे याने संदीप संदीप उत्तर्डे यांना शिवीगाळ करत दोन-तीन दिवसात मी काय करतो हे बघच अशी धमकी दिली होती. यासंदर्भात संदीप उत्तर्डे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध फिर्याद दिलेली आहे. अक्षय बोऱ्हाडे याने पत्रकार संदीप उत्तर्डे यांना दिलेल्या धमकी प्रकरणी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी जुन्नर येथे काळे फीत लावून जुन्नर शहरातून मोर्चा काढला . जुन्नर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांना निवेदन देऊन अक्षय बोऱ्हाडे यांचे कडक कारवाई करून तत्काळ अटक करावी , अशी मागणी केली.

यावेळी पत्रकार सचिन कांकरिया , संजय थोरवे यांनी पत्रकार संदीप उत्तर्डे यांना धमकी देऊन शिवीगाळ करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे याचेवर कारवाई करावी यावी अशी मागणी केली . या मोर्च्यात , जेष्ठ पत्रकार रवींद्र कोल्हे , सचिन कांकरिया , किरण वाजगे , संजय थोरवे , अरुण मोरे , सुरेश वाणी , अण्णा भुजबळ , संजोग काळदंते , रमेश तांबे , पराग जगताप , मंगेश पाटे , नितीन गाजरे ,किरण साबळे ,अमोल गायकवाड ,पवन गाडेकर, नितीन ससाने, फल्ले, बाबाजी टाकळकर, अशोक कोरडे, महेश घोलप , मनोहर हिंगणे, अमर भागवत , राजेश कणसे , अशपाक पटेल ,अभिषेक वामन,काका जाधव, सोनू गाडे, अशोक डेरे, कैलास बोडके , पंढरीनाथ सरोगदे तसेच जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघ, जुन्नर तालुका पत्रकार संघ , शिवजन्मभूमी पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!