ताज्या घडामोडी

चारंगबाबा दूध संकलन केंद्र गुंजाळवाडी(बेल्हे) मार्फत लाभांश व दीपावली भेटवस्तू वाटप

बेल्हे (दि. २५) प्रतिनिधी
चारंग बाबा दूध संकलन केंद्र गुंजाळवाडी मार्फत संस्थेचे संस्थापक लहूशेठ गुंजाळ व समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांच्या हस्ते गवळी बांधवांना लाभांश व दीपावली भेटवस्तू वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेत सन २०२४-२५ या कालावधीमध्ये सर्वात जास्त दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक यांचाही सत्कार करण्यात आला.सुभाष शिवाजी बोरचटे यांनी या आर्थिक वर्षात ४४,४०४ लिटर, बाळू एकनाथ गुंजाळ यांनी ३२,७४९, निखिल तानाजी बांगर यांनी ३२,६४२, मनोज गणपत बोरचटे यांनी २४,०२२,विशाल विलास बोरचटे यांनी २०,०८९ लिटर इतका दूध पुरवठा एका आर्थिक वर्षात केला आहे.सर्व दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक व गवळी यांना दीपावलीनिमित्त मिठाई,साड्यांचे वाटप करून सर्व दूध उत्पादकांची दिवाळी गोड केली.यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी सर्व गवळ्यांना जास्तीत जास्त दूध पुरवठा करावा.शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते.उच्च व चांगल्या दर्जेचे दूध संस्थेमध्ये येत असल्यामुळे दुधाचा प्रतिलिटर भाव हा इतर संस्थेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर दिला जातो.जनावरांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे,त्यांचे लसीकरण वेळोवेळी करून घ्यावे याबद्दलची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमानिमित्त सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके,संस्थेचे संस्थापक लहूशेठ गुंजाळ,वरिष्ठ दूध संकलन अधिकारी प्रवीण औटी,उद्योजक सुरेश शेठ गुंजाळ,साईकृपा पतसंस्थेचे संचालक दत्तूशेठ गुंजाळ,मा.तंटामुक्ती अध्यक्ष रामदास शेठ गुंजाळ,राजुरी येथील गणेश दूध संस्थेचे संचालक निलेश हाडवळे, पत्रकार राजेश कणसे, शामराव गुंजाळ, केरभाऊ गुंजाळ,सामाजिक कार्यकर्ते भाऊशेठ बोरचटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!