पिंपळवंडीत बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला

पिंपळवंडी -( दि.२) प्रतिनिधी
पिंपळवंडी येथील वाघपट्टा शिवारात बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करुन दोन मेंढ्या व एका कोकराला ठार केले असल्याची घटना सोमवारी ( दि २) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली
याबाबत माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील साकुर येथील मेंढपाळ चिमाजी भागाजी सोन्नर यांचा मेंढीपालन व्यवसाय असून त्यांचा पिंपळवंडी येथील वाघपट्टा शिवारात कुकडी कालव्याशेजारी जगदीश गाडेकर यांच्या शेतात वाडा मुक्कामी होता बाजूला असलेल्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मेंढ्याच्या कळपात शिरून हल्ला केला त्यामध्ये दोन मेंढ्या व एका कोकराला ठार केले यावेळी मेंढपाळ चिमाजी सोन्नर यांनी व वाड्यावर असलेल्या त्यांच्या परीवारातील सदस्यांनी हातात कु-हाड व काठ्या घेऊन बिबट्याला प्रतिकार केला सर्वांनी आरडाओरडा करताच बिबट्याने धुम ठोकली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल संतोष साळूंके यांनी घटनास्थळी पंचनामा केला
पिंपळवंडी परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे बिबट्याची अजूनही दहशत असून नागरीक बिबट्याच्या दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे
चौकट – चार ते साडेचार महिन्यांपूर्वी पिंपळवंडी येथील लेंडेस्थळ शिवारात शेतात काम करणा-या महिलेवर हल्ला करुन जखमी केले होते त्यानंतर बिबट्याने काळवाडी येथे एका लहान बालकावर तर पिंपरीपेंढार येथील एका महिलेवर हल्ला करुन ठार केले होते त्यानंतर वनखात्याने बिबट्यांना पकडण्यासाठी मोहिम राबवून या परिसरात सात ते आठ बिबटे जेरबंद करण्यात आले होते त्यानंतरही बिबट्यांचे हल्ले सुरूच आहेत त्यामुळे परिसरात बिबट्यांची संख्या नेमकी किती आहे याबाबत साशंकता निर्माण झाली असून नागरीक मात्र बिबट्याच्या दहशतीखाली आहेत



