याझाकी इंडिया कंपनीमध्ये अभियांत्रिकी च्या २३ विद्यार्थ्यांची निवड

बेल्हे ( प्रतिनिधी) समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये याझाकी इंडिया प्रा.लि.यांच्या वतीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाअंतर्गत “ऑनलाईन कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह-२०२५” चे नुकतेच आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी दिली.
या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
याझाकी कंपनीच्या एच आर व टेक्निकल पॅनेलमार्फत ऑनलाईन चाचणी व मुलाखती घेण्यात आल्या.
निवड प्रक्रियेत एकूण २३ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी दिली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याझाकी इंडिया यांच्या रांजणगाव येथील प्रकल्पात इंटर्नशिप देण्यात येणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
रावा हाके,आदित्य देशमुख,समाधान चौधरी,किशोर भोगाडे,माधुरी शिंदे,दिव्या निलख,रोहन गावडे,साक्षी गोर्डे,साक्षी कोल्हे,सुरज पवार,प्रेरना शिंदे,वैष्णवी जाधव,दत्ता राजापूरे,रोहन वाघ, आफताब मुनावर,कुणाल बडवे,पवन गुंजाळ,सौरभ भडंगे,सोहेल पटेल,तेजस बाचकर,विठ्ठल कोळेकर,किशोर पाल,आरती औटी.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



