वडगाव कांदळीत ह.भ.प.चक्रधरमहाराज पाचपुते यांची किर्तनसेवा संपन्न

वडगाव कांदळी ( दि १४) प्रतिनिधी
श्रीदत्त जयंती व श्रीदत्त मंदिर ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आदर्शगाव वडगाव कांदळी येथील पवार मळा याठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले.
त्यात प्रथम दिवसाची सेवा युवा कीर्तनकार हभप चक्रधर महाराज पाचपुते यांची झाली. कीर्तन सप्ताह गावोगावी का करतात ? सप्ताह केल्याने समाजाला कोणते फायदे होतात हेही त्यांनी कीर्तनातून समाजापुढे स्पष्ट केलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर चिंतन करत असताना संतांच्या शब्दांची उंची किती मोठी आहे हे महाराजांनी वर्णन करून सांगितली. आत्ताच बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात कमी वयामध्ये वयाच्या १८ व्या वर्षी विश्व विजेतेपद मिळवलेले डी. गुकेश यांचे कवतुक करतांना प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनामध्ये असं ध्येय ठरवून ते ध्येय प्राप्त करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावेत असं तरुणांना महाराजांनी कीर्तनातून संदेश दिला. नामस्मरणाने आपल्याला जीवनामध्ये किती फायदे होतात व सतत नामस्मरण केल्याने आपल्या जीवनातील दुःख, मानसिक टेन्शन कसे कमी होते याचे महाराजांनी कीर्तनात प्रात्यक्षिक श्रोत्यांकडून करून घेतले. कीर्तनाच्या शेवटी महाराजांनी जे यूट्यूब च्या माध्यमातून कथा कीर्तन प्रवचन लोकांपर्यंत पोहचवतात त्या यूट्यूबर्स ची वास्तव परस्थिती वर्णन करून सांगितली.




