ताज्या घडामोडी
काळवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाचा मुलगा ठार : दोन दिवसात घडली दुसरी घटना
पिंपळवंडी -( दि ८) प्रतिनिधी
पिंपळवंडी ( लेंडेस्थळ) येथे शेतात काम करणाऱ्या शेतमजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता ही घटना ताजी असतानाच काळवाडी येथे घराच्याबाहेर अंगणात खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलावर बिट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात हा मुलगा ठार झाला आहे ही घटना बुधवारी ( दि ८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली
रूद्र महेंद्र फापाळे ( वय ८ वर्ष रा बेलापूर ता अकोले जि अहमदनगर) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की काळवाडी ( ता जुन्नर) येथील ग्रामदैवत कालिकामाता यात्रा उत्सव मंगळवार ( दि ७) पासून सुरु झाला आहे रूद्र हा त्याचा मामा सचिन रोहिदास काकडे यांच्याकडे यात्रेसाठी आला होता तो सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घराच्या ओट्यावर काही मुलांसोबत खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला व त्याला बाजूला असलेल्या उसाच्या शेतात घेऊन गेला या हल्ल्यात या बालकाचा म्रुत्यू झाला आहे
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओतुर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्यासह वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत
दरम्यान सोमवारी ( दि ६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पिंपळवंडी येथील लेंडेस्थळ शिवारात शेतात काम करणा-या आश्विनी मनोज हुलवळे या चोबिस वर्षीय शेतमजूर महिलेवर बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले होते ही घटना ताजी असतानाच पुन्हा काळवाडी येथे बिबट्याने लहान बालकावर हल्ला करुन ठार केल्यामुळे परिसरात वनखात्याबाबत संतापाची लाट उसळली आहे जुन्नर तालुक्यात बिबट्याकडून वारंवार माणसांवर हल्ले होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे घटना घडून गेल्यानंतर वनखाते खडबडून जागे होते व त्या परिसरात पिंजरा लावून नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्याचे काम करते वनखात्याकडून याबाबत कायमस्वरूपी उपायोजना होत नसल्यामुळे नागरीकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे




