डाॅ आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या वतीने निर्माल्य संकलन

पिंपळवंडी -( दि १७) आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या वतीने पिंपळवंडी व कांदळी या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला
दरवर्षी पिंपळवंडी येथील कुकडीनदीच्या तीरावर मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होत असते श्री गणरायाचे विसर्जन करत असताना गणेश भक्तांकडून निर्माल्य नदीपात्रात टाकले जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीत प्रदूषण होत असते ही बाब लक्षात घेऊन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या वतीने पिंपळवंडी स्टॅड पिंपळवंडी गावठाण वैशाखखेडे व कांदळी या ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्र सुरु करण्यात आली होती सुमारे चाळीस ते पन्नास सेवेक-यांच्या माध्यमातून गेल्या न ऊ दिवसांपासून हा उपक्रम सुरु होता गणेश विसर्जन करण्यासाठी येणा-या गणेश भक्तांना सुचना देण्यासाठी स्पिकर व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती या उपक्रमास नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून गेल्या न ऊ दिवसात मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन करण्यात आले गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असल्याचे प्रतिष्ठाणच्या सेवेक-यांनी सांगीतले या विसर्जन मिरवणूकीवेळी आळेफाटा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला



