ताज्या घडामोडी

सरकारी हाॅस्पीटल म्रुत्यू प्रकरणी आरोग्य मंत्र्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची  आम आदमी पार्टीची मागणी

मुंबई -( दि ४).प्रतिनिधी सरकारी हॉस्पिटलमधील मृत्यू कांडावर आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष  धनंजय शिंदे यांनी केली आहे  याबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे
कळवा ठाणे येथे १८, नांदेड येथे ३५, छत्रपती संभाजीनगर येथे १० आणि नागपूर येथे २५ मृत्यू एका दिवसात सरकारी रुग्णालयात झाले आहेत. हे मृत्यू नसून सरकारी हत्या आहेत, अशा हॉस्पिटलमधील महाभयंकर मृत्यूकांडावर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला भ्रष्टाचाराच्या भस्म्या रोग झाला असून संपूर्ण यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. रुग्णालयातील यंत्रसामुग्री नादुरुस्त असल्याने धुळ खात पडलेली आहे. मोठ्या शहरामध्ये आरोग्य सेवांची ही अवस्था आहे तर ग्रामीण रुग्णालयातील अवस्था काय असेल याची कल्पना न केलेली बरी अशा शब्दात धनंजय शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला.
आप चे राज्य संघटन सचिव संदीप देसाई हे पत्रकारांशी बोलतांना म्हटले की महाराष्ट्र सरकार सर्व सुरळीत चालु असलेल्या गोष्टी बंद करीत आहे जसे की, महाराष्ट्रातील सरकारी नोकर भरती बंद करणे, सरकारी शाळा बंद करणे या पाठोपाठ आता सरकारी हॉस्पिटल सुद्धा बंद करण्यासाठी मोठे षडयंत्र आखत आहे. सरकारला नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता येत नसेल तर ती कशी घेतली पाहिजे हे समजण्यासाठी आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारची आरोग्य व्यवस्था बघण्यासाठी आम्ही सरकारला निमंत्रित करतो.
राज्य संघटन सचिव मनिष मोडक यांनी सांगितले की महाराष्ट्र सरकार, सरकारी शाळा भाड्याने देत आहेत, दारूची दुकाने वाढवित आहेत परंतु सरकारी हॉस्पिटल्समध्ये औषधे- साधनसामुग्रीची टंचाई, डॉक्टर्स व सहाय्यक कर्मचारी यांची कमतरता असल्यामुळे कोवळ्या जीवांना व नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. हे कसले गतिमान सरकार?
राज्य संघटन सचिव भूषण धाकुलकर म्हटले की राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. औषधे नसल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे हे अत्यंत चीड आणणारे आहे. सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इंव्हेंट करण्यासाठी, जाहिरातबाजी करण्यासाठी आणि आमदार खरेदीसाठी पैसे आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या औषधे खरेदीसाठी पैसे नाहीत का? असा संतप्त प्रश्न केला आहे.या पत्रकार परिषदेस बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन नांदुरकर, वाशिम जिल्हा अध्यक्ष अरविंद कानकिरळ व जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!