ताज्या घडामोडी

विश्वकर्मा पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दिपावली भेटवस्तू वाटप

आळेफाटा -( दि ७) प्रतिनिधी
आळेफाटा ( ता जुन्नर) येथील विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना दिपावली भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले
पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हरीदास ताजवे उपाध्यक्षा मंगल दिवेकर मानद सचिव सुनिलशेठ जाधव संचालक बंडोपंत ताजवे रामदास राऊत देविदास ताजवे बाळासाहेब गाडेकर विलास जाधव नितिनशेठ भद्रिगे जयहिंद भुतांबरे रोहितशेठ जाधव संतोष जाधव शामराव जाधव संचालिका शारदा भालेराव सल्लागार किसनराव जाधव अशोकशेठ काठेड विठ्ठलशेठ जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी  विलास डावखर लेखनिक रवींद वाव्हळ दिनेश कु-हाडे महेंद्र नरवडे यांच्या उपस्थितीत पतसंस्थेच्या सभासदांना दिपावली भेटवस्तू वाटप करण्यात आले
या प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष हरीदास ताजवे यांनी पतसंस्थेच्या प्रगती बाबत बोलताना सांगितले की विश्वकर्मा पतसंस्थेचे जुन्नर तालुका कार्यक्षेत्र असुन संस्थेचे ९२१ सभासद असुन संस्थेचे अधिक्रुत
भागभांडवल एक कोटी रुपये असून वसूल भागभांडवल त्रेसष्ट लाख चौसष्ट हजार पाचशे रुपये आहे तर सहाष्ट लाख त्र्यान्नव हजार एकशे सोळा रुपये निधी आहे तर खेळते भागभांडवल नऊ कोटी चौ-याऐंशी लाख अठरा हजार पाचशे तिन रुपये आहे
संस्थेची गंतवणूक दोन कोटी एकोनपन्नास लाख चौपन्न हजार पाचशे चौतीस रुपये आहे तर येणे कर्ज सात कोटी नऊ लाख एकतीस हजार तीनशे तीस रुपये संस्थेकडे आठ कोटी चौदा लाख अठ्याहत्तर हजार रूपयांच्या ठेवी आहेत एकूण उत्पन्न एकोननव्वद लाख एकोनपन्नास हजार एकशे पस्तीस रुपये आहे तर   संस्थेला अकरा लाख सत्तावन्न हजार सातशे चौपन्न रुपये झाला असून दहा टक्के लाभांश वाटप करण्यात येत असल्याचे अध्यक्ष हरीदास ताजवे यांनी सांगितले
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!