भोरवाडीत साईबाबांच्या पालखीचे उत्साहात स्वागत :

वडगावकांदळी ( प्रतिनिधी
साई समर्थ सेवा मंडळ, नारायणगाव – मांजरवाडी – खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे ते श्री. क्षेत्र शिर्डी पायी वारीचे भोरवाडी, वडगाव (कांदळी) येथे साईभक्त श्री. सागर दहितुले यांच्या निवासस्थानी मातोश्री स्व. साईभक्त शैला शामराव दहितुले यांच्या शुभाशीर्वादाने मोठ्या भक्तिमय वातावरणात सलग २०व्या वर्षी जवळपास साडेपाचशे साईभक्तांच्या उपस्थितीत आगमन झाले. यावेळी तन्मय शिंदे यांच्या वतीने श्री. साईबाबा पालखी व साईभक्तांची बिरोबा डॉल्बी TS555+ व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली; साई पालखी आगमन सोहळ्याचे नियोजन क्रांतिवीर महिला ग्रुप ने तर सर्व वारकऱ्यांच्या नाष्टा, चहा, पाणी व्यवस्था क्रांतिवीर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजनात पाहिली. यावेळी पायी वारीतील साईभक्तांना श्री. दत्त केटरर्स चे श्री. रविंद्र सोनवणे व श्री. देविदास दशरथ भोर यांनी सुंदर असे उपिट व चहा नाष्ट्याची व्यवस्था केली, ओंकार इव्हेन्ट चे ओंकार पाचपुते यांनी मंडप व्यवस्था केली.
यावेळी श्री. सागर दहितुले परिवाराकडून श्री. साईबाबांची महाआरती करण्यात आली तद्नंतर उपस्थित साईभक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्याला घाटकोपर, मुंबई चे नगरसेवक साईभक्त दिपकबाबा हांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

पालखी सोहळ्याचे श्री. गुंडीराज थोरात व नगरसेवक दिपकबाबा हांडे यांचा सन्मान दहितुले परिवाराच्या वतीने तर श्री. रवींद्र सोनवणे व ओंकार पाचपुते यांचा सन्मान श्री. गणेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश शिंदे केले तर आभार पालखी सोहळा प्रमुख श्री. जयंत नलावडे यांनी मानले.



